नमस्कार मित्रांनो ,केळी आपण नेहमीच्या आहारात घेत असतो. डॉक्टर हे आपल्याला चांगल्या आरोग्यासाठी केळी खाण्यासाठी सांगतात. भारतात सर्वात जास्त केळीचे उत्पादन घेतले जाते.केळी चिप्स चे उत्पादन तर अतिशय प्रमाणात घेतले जाते.पण तुम्ही कधी लाल केळी खाल्ली आहे का? लाल केळी आरोग्यासाठी खूपच उत्तम असल्याचे निदर्शनात आले आहे.ह्या केळीत न्यूट्रिशन जास्त असल्यामुळे केळीला मागणी जास्त आहे.
महाराष्ट्रात लाल केळीचे उत्पादन सर्वात पहिले सोलापूर जिल्ह्यात घेण्यात आलेले आहे. सिव्हिल इंजिनिअर असलेल्या तरुणानी ही किमया साधली आहे.आता उर्वरित महाराष्ट्रात हा तरुण लाल केळीचे मार्गदर्शन करून आपल्या सारख्या अजून शेतकऱ्यांना तयार करत आहे.
लाल केळी Red Banana पीक माहिती
लाल केळी या पिकासाठी जास्त रासायनिक खताचा वापर न करता पीक आपल्याला चांगल्या पद्धतीने घेता येते. शेन,गोमूत्र याचा वापर करून आपण लाल केळी खत व्यवस्थापन करू शकतो. कमी पाण्यात येणारही चांगलं पीक आहे. या वर पिवळ्या केळी सारखी रोगराई सुद्धा येत नाही. 12 ते 16 महिन्यांचे हे पीक आहे.
यात आपल्याला जून ते ऑक्टोबर या वेळेत खूप चांगला दर मिळतो.वर्षा काठी हा तरुण केळी उत्पादनात एक कोटी कमाई पर्यंत गेला आहे.एकरी बाराशे ते साडेबाराशे रोपे लागतात. वीस ते पंचवीस रुपयाला एक रोप मिळते. एकरी पाच ते साडेपाच लाखापर्यंत उत्पन्न मिळते.
लाल केळीची मागणी बघता पुरवठा खूप कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्याला हे पीक घेतल्यानंतर समृद्धी येणार आहे. आणि खर्चिक नसल्यामुळे नफा ही चांगला मिळतो.
लाल केळी Red Banana खाण्याचे फायदे
1.रोग प्रतिकारशक्ती वाढते.
2.लाल केळी डोळ्यांसाठी फायदेशीर.
3.वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत.
4.अशक्तपणा कमी करण्यास मदत.
5.लाल केळी म्हणजे इन्स्टंट एनर्जी.
अधिक माहिती साठी आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा
**************************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
**************************************
****************************************
2 thoughts on “Red Banana:लाल केळी,इंजिनिअर ने सोडली नोकरी,केळी पिकात वर्षाला मिळवतो १ कोटी उत्पन्न,”