महाराष्ट्रात सगळीकडेच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या शेवटच्या टप्प्यात पूर्ण झाल्या आहेत.यावेळी मान्सून जरी उशिराने आला असला तरी लवकरात लवकर पूर्ण महाराष्ट्रावर पसरला आहे.महाराष्ट्रात ठोक पिकांमध्ये सोयाबीन व कापूस घेतले जाते.त्यातील आपण आज कापूस या पिकातील काळजी कशी घ्यावी हे बघणार आहोत.
कापूस या पिकातील सुरुवातीचे 25 ते 30 दिवस अतिशय महत्त्वाचे असतात.सुरुवातीची मशागत ही जर व्यवस्थित झाली तरच पुढील पीक जोमाने येते.सुरुवातीची फवारणी अतिशय खर्चिक न करता कशी करता येईल. याविषयी आपण आज बघणार आहोत.
शेतकरी मित्रांनो कापूस पिकावर पहिली फवारणी किती दिवसांनी करावी किमान कापूस लागवडी नंतर 25 ते 30 दिवसाच्या आत ही पहिली फवारणी करावी, सुरुवातीला कापूस पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स, जास्त प्रमाणात दिसून येत असतात. त्याच बरोबर जास्तीत जास्त पाते लागवड होणे आवश्यक आहे. मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स, अशा बहुतांश किडीवर 100% नियंत्रण मिळेल.याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत.
शेतकरी मित्रांनो कीटकनाशकाचा विचार केला तर ( Imidacloprid 17. 8%) किंवा ( Thimathoxam 25%) हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीच्या कीटकनाशकाचा वापर करू शकता. इतर कोणत्याही कंपनीचं सेम घटक असलेलं कीटकनाशक त्या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. जे काही तुमचे प्रोडक्ट आहे, 15 ते 18 लिटर प्रति पंपसाठी आपल्याला 10ml वापरण गरजेचे आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या काळात 19-19-19 ह्या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करावा. याचे प्रमाण प्रति पंपसाठी 80 ते 100gm वापरायचं आहे.
यासारख्या अजूनही माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायला विसरू नका.
**************************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
*************************************
************************************
2 thoughts on “kapus favarni:कापूस पहिली फवारणी, कमी खर्चात जबरदस्त रिझल्ट मिळवा या औषधाने”