fat loss tips:हे ७ घरगुती उपाय पोटाची चरबी कायमची गायब….!

आपण नेहमीच बघत असतो वाढलेल्या पोटामुळे खूप लोक त्रस्त असतात. अशातच खूप सारे लोक वेगवेगळ्या उपायांमधून पोट कमी करण्यासाठी सल्ला देत असतात. त्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही चुकीच्या पद्धतीने आपण जर पोटाची चरबी कमी करण्याची पद्धत वापरत असाल तर ते हानिकारक आहे.’जुन तेच सोन’म्हणजे पोटाची चरबी कमी करण्यासाठी आज आपण काही आयुर्वेदिक उपाय बघणार आहोत. 

यात सर्वात पहिला आयुर्वेदिक उपाय म्हणजे पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते ती मेथीच्या दाण्यांची पावडर. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर मिक्स करा. आणि सकाळी उठल्यानंतर काही न खाता नियमित या पाण्याचं सेवन करा.यात नक्कीच तुम्हाला पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.

दुसरा आयुर्वेदिक उपाय म्हणजे जेव्हा तोंडातील लाळेमध्ये कार्बोहायड्रेट जमा होतं तेव्हा पचनक्रियेला सुरुवात होते. म्हणूनच जेवण पूर्णपणे चावून खाल्लं पाहिजे. जेवताना प्रत्येक घास तुम्ही चावत असाल तर त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. यामुळे तुमची पचनक्रिया देखील सुधारते. तसेच सॅटिटी हार्मोनमध्ये वाढ होऊन तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं.यात आपल्याला जे पोटाला हवे तेच मिळतं आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळते.

तिसरा आयुर्वेदिक उपाय म्हणजे तुम्ही नेहमी थंड किंवा साधं पाणी पिता. मात्र ही चूक कधीही करू नका. जेव्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा.यामुळे आपले शरीर हायड्रेट देखील राहते.आणि पचनक्रिया व्यवस्थित होऊन पोटाची चरबी कमी होण्यास मदत मिळेल.

चौथा आयुर्वेदिक उपाय म्हणजेआयुर्वेदामध्ये देखील नियमित व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तुम्ही वेगाने चालणं देखील गरजेचं आहे. पोटांच्या कडा पकडून जवळपास ३० मिनिटे तुम्ही वेगाने चाला. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास भरपूर मदत मिळू शकते.

पाचवा आयुर्वेदिक उपाय म्हणजे नियमित कॅलरीच्या ५० टक्के कॅलरी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये खा. कारण यावेळी तुमची पचनक्रिया अधिक मजबूत असते. तसेच रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही कमीत कमी कॅलरी खा. तसेच संध्याकाळी ७च्या आधीच जेवण करा. यामुळे तुमची पोटाची चरबी वाढणार नाही.

सहावा आयुर्वेदिक उपाय म्हणजे,आलं सुकवा. या सुक्या आल्याची पावडर म्हणजे थर्मोजेनिकचं मुख्य स्त्रोत्र आहे. यामुळे तुमची वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास भरपूर मदत मिळते. पाण्यामध्ये सुक्या आल्याची पावडर मिक्स करा. आणि हे पाणी उकळवा. पाणी थोड्याफार प्रमाणात थंड झालं की याचं सेवन करा. यामुळे चयापचय शक्ती अधिक वाढते तसेच अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी भरपूर मदत मिळू शकते. 

सातवा आयुर्वेदिक उपाय म्हणजे,शरीरामधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास त्रिफळ अधिक उपयुक्त ठरते. यामुळे तुमची पचनक्रिया देखील अधिक सुधारते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी त्रिफळाचे चुर्ण अधिक उत्तम मानले जाते.

यासारख्या अजूनही माहितीसाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा

***************************

आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE

****************************

red banana benifits

*****************************

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला