नमस्कार शेतकरी मित्रांनो,आज आपण नवीन शेततळे योजना 2023 याविषयी बघणार आहोत. आपल्याला माहीतच असेल. या आधी शेततळे जर शेतकऱ्याला हवे असेल तर त्याला ते लॉटरी पद्धतीने मिळायचे. परंतु नव्याने कृषी मंत्री झालेले धनंजय मुंडे यांनी आता याविषयी तातडीने निर्णय घेतलेला आहे.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकार करताच शेतकऱ्यांसाठी शेततळे याविषयी काही बदल करून शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. शेततळ्याच्या जाचक अटी शिथिल करून सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळावा याचा विचार त्यांनी केला आहे.
आतापर्यंत शेतकऱ्यांना या योजनेत बराच त्रास सहन करावा लागला होता. परंतु आता मागेल त्याला शेततळे अशी योजना 2023 राबवण्याचा विचार शासनाने केला आहे. याविषयी लवकरात लवकर निर्णय घेऊन लाभार्थ्यांना योजनेचा फायदा कसा घेता येईल याचा विचार करण्यात येत आहे.
लॉटरी पद्धतीमुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहिल्याचे दिसून आले होते. त्यामुळे आता लॉटरी पद्धत बंद करून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याविषयी लवकरात लवकर निर्णय घेण्याचा सूचना संबंधित विभागाला दिले आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या कागदपत्रांची पूर्तता लाभार्थ्यांना करायची आहे. ते लवकरच सांगण्यात येणार आहे. त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर त्वरित लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
याविषयी अजून जाणून घेण्यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा…

*****************************
ई-पीक पाहणी केली नाही तर पीक विमा नाही मिळणार आत्ताच करा नोंदणी click here
*****************************
1 thought on “शेततळ नवीन २०२३ योजना चालू आता सगळ्यांना मिळणार शेततळे ”