महाराष्ट्र शासनाने यावेळी शेतकरी राजाचे ओझे हलके करण्याचा विचार करून एक रुपयात पिक विमा या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना पिक विमा भरणे सोयीस्कर झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याचे आवाहन केले आहे.
शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
यासाठी शेतकऱ्याकडे जमिनीचा ७/१२ नंतर ८/अ, बँक पासबुक पिकपेरा आणि नंतर मोबाईल नंबर, आधार क्रमांक. हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या जवळील CSC सेंटर वर जाऊन 1 रुपयात तुमच्या शेतीपिकाची नोंद करू शकता. म्हणजेच 1 रुपयात पिकविमा भरू शकता.
शासनाने सर्व शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की, खरीप हंगामातील ई-पीक पाहणी ही आवश्यक आहे. ती जर नसेल तर आपल्या 7\12 वर पीक लावण्यात येणार नाही. आणि याचा फटका शेतकऱ्यांना पिक विमा मध्ये बसेल. जर आपण ई-पीक पाहणी केली नाही तर पिक विमा ही मिळणार नसल्याच सांगण्यात येत आहे.ई-पीक पाहणी कशी करायची हे आपण बघूया.
ई-पीक पाहणी कशी करायची ?
ई-पीक ॲप मध्ये सर्वात प्रथम आपल्या मोबाईलची लोकेशन ऑन करावे.महसूल विभाग निवडावा.नवीन असाल तर खातेदार नोंदणी करून पुढे जावे.पिक माहिती नोंदवा या ऑप्शन वर क्लिक करून शेताच्या मध्यावर उभा राहून पिकाचा क्लिअर फोटो काढून अपलोड करणे.म्हणजे 7/12 वर आपल्या पिकाची नोंद घेतली जाईल.
epik pahani version 2 app download
ई-पीक व्हर्जन 2 ॲप प्ले स्टोअर वर डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE.
*****************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
*****************************
**************************
6 thoughts on “हे काम केले तरच मिळणार १ रुपयाचा पीक विमा लाभ बघा आत्ताच”