वसुबारस हा सण या वर्षी ९ नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.

या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते.

गाई वासराला गोड नवैद्य खायला दिला जातो.

गोवंश पूजा वेळ सायंकाळी ५:३० ते ८:१५ आहे.

हा दिवस दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो.

या दिवशी गायीच्या पायावर पाणी घालून तिची पूजा केली जाते.

सुवासिनी बायका गायीला हळदी कुंकू वाहून ओवाळतात.

या दिवशी घरासमोर रांगोळी काढून दिवे लावले जातात.

 शहरी भागात या दिवशी मातीच्या गाय वासराची पूजा करतात.