नमस्कार मित्रांनो, आपण बघितले असेल बऱ्याच जणांच्या मोबाईलवर अलर्ट मेसेज येत आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सगळीकडे चर्चा चालू आहे. हा मेसेज नेमका कशाचा? तर आपण जाणून घेऊया या व्हायरल मेसेज मागील सत्य.
हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा असल्याचा व्हायरल मेसेज बऱ्याच लोकांच्या मोबाईलवर येत आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील मोबाईल युजर्सच्या मोबाईलवर हा मेसेज येत आहे. त्यामुळे सर्वत्र ही चर्चा चालू आहे. की हा मेसेज नेमका कशाचा याने आपल्याला किंवा आपल्या मोबाईलला काही आर्थिक हानी तर होणार नाही ना या संभ्रमात बहुतांश लोक दिसत आहे.
viral alert msg मागील सत्य
केंद्र सरकार इमर्जन्सी अलर्ट ही चाचणी घेत आहे. भविष्यात काही आपल्या भागात इमर्जन्सी सूचना असतील तर त्या इमर्जन्सी सूचनांचा अलर्ट आपल्या मोबाईलवर दिला जाईल. असेही सांगण्यात येत आहे. ही एक ट्रायल बेसिस वर पडताळणी चालू असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना घाबरून न जाण्याच आवाहन केल जात आहे.
जालना सांगली सातारा नाशिक अहमदनगर औरंगाबाद महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात हा व्हायरल अलर्ट मेसेज आलेला आहे. भविष्यातील इमर्जन्सी सूचना लवकर नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याचा वापर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
***********************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
***********************
***************************