Tukde Bandi Kayda Latest News GR : गुंठेवारी व्यवहार होणार चालू ! कोर्टाने दिली शासनाला शेवटची तारीख

मस्कार मित्रांनो, या लेखामध्ये आम्ही आपल्या सोबत गुंठेवारी व तुकडा बंदी विषयी न्यायालयाने दिलेल्या महत्त्वाच्या निकालाबद्दल माहिती देणार आहोत.  मित्रांनो हा विषय तसा जुनाच आहे आणि 2021 पासून चालू आहे जेव्हापासून महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये गुंठेवारी चे व्यवहार थांबवण्यात आले आहेत.

शासनाने तुकडा बंदी कायदा आणल्याने गुंठ्यात होणाऱ्या रजिस्ट्री म्हणजेच खरेदी खत बंद झाले आहे याच निर्णयाविषयी लोकांमध्ये प्रचंड राग दिसून येत आहे. कारण गरीब जनता गुंठ्यामध्येच जमीन घेऊ शकते. एवढे जमिनीचे भाव वाढले आहेत आणि NA  करायला प्रचंड खर्च येत असल्याने लोक पहिले गुंठ्यांमध्ये जमीन  खरेदी विक्री करून त्याची रजिस्ट्री करून व्यवहार करत होते.  पण या तुकडा बंदी कायद्यामुळे गुंठेवारी चे सर्वच व्यवहार महाराष्ट्र भर ठप्प झाले आहेत.

शासनाच्या याच निर्णया विरोधात छत्रपती संभाजीनगर येथील काही नागरिकांनी उच्च न्यायालयामध्ये या कायद्याविरोधात याचिका दाखल केली.  ज्याचा निकाल  मागील महिन्यातील   12  एप्रिल 2023  रोजी  माननीय उच्च न्यायालयाने दिला. त्यात न्यायालयाने असे म्हटले की तुम्ही लोकांना काहीही पर्याय न देता रजिस्ट्री पासून वंचित ठेवू शकत नाहीत  आणि  लोकांना  गुंठेवारी रजिस्ट्रिया करण्यापासून  रोखू शकत नाहीत. माननीय उच्च न्यायालयाने  शासनाला सुप्रीम कोर्टात निर्णयाविरोधात याचिका करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली.

Latest Update गुंठेवारी व्यवहार  लवकरच चालू होणार

शासनाने या एक महिन्यांमध्ये  माननीय उच्च न्यायालयाच्या निकाला विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली नाही  परंतु  एक महिना पूर्ण होण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात 12  मे 2023  रोजी  माननीय उच्च न्यायालया विनंती केली की  विषय थोडा मोठा असल्याने  सुप्रीम कोर्टात  याचिका दाखल करण्यासाठी  अजून आठ आठवड्यांची  मुदत देण्यात यावी.

या  शासनाच्या  मुदत वाढवून देण्याच्या मागणी विरोधात, नागरिकांतर्फे  लढत असणाऱ्या वकिलांनी आक्षेप नोंदवला  आणि सांगितले की  आम्ही दोन वर्षापासून या कायद्याविरोधात लढत आहोत  आणि माननीय उच्च  न्यायालयाच्या आदेशानुसार  अजून एक महिना थांबलो आहोत.  त्यामुळे शासनाला  सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी अजून दोन महिना वाढवून देण्यात येऊ नये.

 त्यावर न्यायालयाने सांगितले की न्यायापासून कुणीही वंचित राहू नये.  म्हणून एक शेवटची संधी म्हणून  शासनाला सुप्रीम कोर्टामध्ये  आक्षेप नोंदवण्यासाठी  अजून चार आठवड्यांची मुदत  वाढवून देण्यात येत आहे.

याचाच अर्थ असा आहे मित्रांनो  की पुन्हा  नवीन तारीख  12 जून  2023  पर्यंत  गुंठेवारी चे व्यवहार करन्यासाठी  नागरिकांना  वाट पहावी लागणार आहे.

जर शासनाने  एक महिन्याच्या आत सुप्रीम कोर्टा  कडे याचिका दाखल करून उच्च न्यायालया विरोधात स्टे आणला  तर हे प्रकरण लांबू शकते  आणि जर  शासनाने सुप्रीम कोर्टाकडे  एक महिन्याच्या आत  उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात  याचिका दाखल केली नाही तर तुकडा बंदी कायदा हा रद्द होऊन  पुन्हा  गुंठेवारी खरेदीखत अर्थात  गुंठ्यांमध्ये होणारी  रजिस्ट्री  चालू होईल.

आम्ही आपणास 13 जून रोजी  परत  नवीन अपडेट  कळवू.  धन्यवाद

********************************

Maharashtra Shasan: महाराष्ट्रात 4625 जागांसाठी तलाठी मेगा भरती – मराठी टायगर |🐯| MarathiTiger.com

********************************

********************************

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला