नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण टॉप ५ सोयाबीन वाण जे शेतकरी मित्रांच्या अनुभवातून व कृषिकांच्या सलयातून निवडलेले आहे. ते आज आपण बघणार आहोत.मित्रांनो सगळ्यात महत्वाच म्हणजे आपण बघत असाल बाजारामध्ये येत असलेल्या बोगस बियाणांपासून सावधान राहून आपल्याला चांगल्या वाणाची निवड करायची आहे.तर खाली दिलेल्या वाणांमधून जे सोयाबीन बियाणं आपल्या जमिनीस सूट होईल त्या प्रमाणे निवड करावी.
1) KDS992 वाण
शेतकरी मित्रांनो महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल आहे. वेगवेगळ्या कंपन्यांकड ह्या सोयाबीन वाणाची बियाण उपलब्ध आहेत. तर तुम्ही आशा कंपन्यांच वाण KDS992 या नावाने येत असेल. तर तुम्ही या सोयाबीनच्या वाणाची लागवड करू शकता.100 te 105 दिवसांमध्ये हे वाण काढणीला येत. त्यातली त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जो तांबेरा रोग वगैरे आपल्याला सोयाबीन वरती पडलेला पाहायला मिळतो. तर त्याच्यावरती आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती दाखवतात आणि त्याच्यासोबतच थोडाफार प्रमाणात जो खोडकिडा वगैरे असतो तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती दाखवताना हा सोयाबीन वाण पाहायला मिळतो.
2) MAUS162 वाण
मित्रांनो मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केलेल नवीनच सोयाबीन वाण आहे. त्याच नाव आहे शेतकरी मित्रांनो MAUS162 मित्रांनो हे वाण सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी 110 दिवसाच्या आत मध्ये पूर्णपणे लागवडीपासून पेरणी पासून काढणीला आलेल पहायला मिळत. आणि एकंदरीत या सोयाबीन वाणाचा उत्पन्नाचा जर विचार केला तर आपण चांगल्या पद्धतीने तिथे लागवड वगैरे जर केली टोकन पद्धतीने लागवड केली असेल. तर बऱ्यापैकी 14 ते 15 क्विंटल पर्यंत प्रति एकरातून तिथे उत्पन्न कदाचित निघू शकत. परंतु सरासरी उत्पन्नाचा जर विचार केला तर 8 ते 10 क्विंटल उत्पन्न निघू शकत.
3) JS335 वाण
हे सोयाबीन वाण भरपूर जुन आहे. भरपूर फेमस आहे आणि भरपूर सारे शेतकरी या वाणाची लागवडीसाठी निवड करत असतात. तर ते म्हणजे शेतकरी मित्रांनो JS 335. मित्रांनो जवाहरलाल कृषी विद्यापीठान हे सोयाबीन वाण विकसित केलेल आहे. जास्तीत जास्त जमिनीपासून फुटवा करतो. उंची याची कमी असती बऱ्यापैकी जर इतर वाणाच्या कम्पॅरिजनमध्ये याचा जर विचार केला. तर शेतकऱ्यांनी वाणाची टोकन पद्धतीने लागवड करून 18 ते 20 क्विंटल पर्यंत प्रति एकरी उत्पन्न मिळवलेल आहे. परंतु सरासरी बऱ्यापैकी आपण दहा ते पंधरा क्विंटल पर्यंत सुद्धा काढू शकतो.
4) 9305 वाण
शेतकरी मित्रांनो भरपूर जे आपले शेतकरी मित्र आहेत ते याचे उत्पादन घेत असतात. तर मित्रांनो 9305 वाण या सोयाबीनच्या या वाणाची लागवड करत असतात. आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो या सोयाबीन बियाणेची लागवड करून जास्तीत जास्त उत्पन्न ते सोयाबीन पासून घेत असतात. या सोयाबीन वाणाची रोगासाठी रोगप्रतिकारक शक्ती खूप आहे. परंतु हा फुटवा करणार वाण नाही. हा त्याची थोडीफार उंची करतो जास्तीत जास्त उंची करून त्याला जास्तीत जास्त शेंगा झालेल्या आपल्याला पाहायला मिळू शकतात.
5) फुले संगम वाण
या सोयाबीन वाणामध्ये रोगप्रतिकार शक्ती खूप आहे. झडतीला सुद्धा हे वाण खूप उत्तम आहे. ह्या वाणाला शेतकऱ्यांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. ह्या वाणाची काढणी वेळेवर झाली पाहिजे . हि काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्ही फुले संगम लागवड केली तर खूप चांगल्या प्रकारे तुमच उत्पन्न निघण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो जास्तीत जास्त 28 क्विंटल या सोयाबीन वाणाचे उत्पन्न तिथे नोंदवण्यात आलेल आहे. सरासरी जर तुम्ही योग्य जर काढल योग्य खत व्यवस्थापन वगैरे जर केल तर कदाचित 12 ते 15 क्विंटल पर्यंत सुद्धा तुम्ही सरासरी या वाणाचे उत्पन्न तिथे काढू शकता.
मित्रांनो सोयाबीनमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहतो म्हणजे खत व्यवस्थापन त्याच्यानंतर दुसरा म्हणजे खोडकिड्यावरती नियंत्रण करण्यात जर आपण यशस्वी झालो तर विक्रमी उत्पादन नक्कीच होणार.
*************************************
**********************************
New Ativrushti Nuksan Bharpai:आजपासून अतिवृष्टी अनुदान खात्यात जमा होणार…….
**********************************
New Cotton Seed:८०० रुपये किमतीची कापूस बियाणे बॅग २३०० रुपयाला……
**********************************
2 thoughts on “Soybean Seeds New:सोयाबीन चे पाच बेस्ट वाण”