नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन 2023 खरीप हंगामातील सोयाबीन काढणी चालू झालेले आहे. काही ठिकाणी सोयाबीन काढून झालेले आहे. शेतकरी आपली सोयाबीन मार्केटमध्ये दाखवण्यासाठी सॅम्पल घेऊन येत आहेत. सध्या तरी सोयाबीनला महाराष्ट्रातील सर्व बाजारपेठांमध्ये 4500 रु. क्विंटल ते 5000 रु. क्विंटल भावाप्रमाणे खरेदी सुरू आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांनी सोयाबीन भाव वाढतील अशी आशा राखलेली आहे. सोयाबीन भाव खर्च वाढणार आहे का? याविषयी आपण जाणून घेणार आहोत. भाव वाढीसाठी बऱ्याच गोष्टी लागतात. यामध्ये शासनाकडूनही शेतकऱ्यांसाठी भाव वाढीचे धोरण चांगल्या रित्या ठरवल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा निश्चित होतो. यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन हे भरपूर साऱ्या गोष्टींवर मात करून बाजार पेठेत आलेले आहे.चला तर मग जाणून घेऊया सविस्तर मध्ये सोयाबीन बाजार भाव soybean bhav विषयी
सोयाबीन भाव भारतामध्ये का पडतात? Why soybean rate decrease in india?
भारतातील 2022-23 मध्ये 3.00 दशलक्ष मेट्रिक टन चा सोयाबीनचा साठा आणि 2022 मध्ये 12.33 दशलक्ष मेट्रिक टन सोयाबीन उत्पन्न यामुळे सोयाबीनच्या किमती सरासरी 6 % इतक्या घसरल्या.यामध्ये लागवडीखाली वाढलेले क्षेत्र, सुधारित उत्पादन क्षमता अशा बऱ्याच प्रकारांचा परिणाम दिसून येतो.
वर्ष 2021 मध्ये सोयाबीन हे 11000 रु. पर्यंत जाऊन आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना यावर्षीही सोयाबीन भाव वाढीची आशा आहे. सोयाबीन भाव निश्चितच उच्चांकी गाठणार असल्याचे तज्ञांनी सांगितलेले आहे. यावर्षी बऱ्याच ठिकाणी सोयाबीन पिकाचे नुकसान झालेले असून याचा परिणाम बाजार भावावर दिसून येणार आहे.बाजारपेठेमध्ये सोयाबीन आवक कमी झाल्यामुळे सोयाबीन भाव हे समाधानकारक वाढतील.
soybean bajar bhav today सोयाबीन आजचे बाजार भाव

महाराष्ट्र मधील मुख्य बाजारपेठेमध्ये सोयाबीन बाजार भाव हे जास्तीत जास्त 5000 रु. प्रतिक्विंटल तर कमीत कमी 3800 रु. इतका भाव दिसून आला. तर महाराष्ट्रातील लातूर बाजारपेठेमध्ये सोयाबीन भाव हे 4600 रु. चालू होते.
जागतिक सोयाबीन बाजारपेठेवर दोन मुख्य देश प्रभावीत असतात ते म्हणजे अमेरिका व ब्राझील.त्या पाठोपाठ अर्जेंटिना हा देश देखील सोयाबीन उत्पादनात अग्रेसर आहे. या तिन्ही देशावर सोयाबीन बाजार भाव टिकून असतात.यावर्षी तिकडे देखील चांगला पाऊस झालेला आहे.त्यामुळे त्यांच्या सोयाबीन उत्पादनात घट होणार नाही.परंतु भारतामधील यावर्षीची परिस्थिती बघता सोयाबीन उत्पादनात घट दिसून येणार आहे. निश्चितच याचा परिणाम बाजार भावामध्ये दिसून येतील. यावर्षी मागील वर्षाच्या तुलनेत सोयाबीनला चांगला भाव राहणार असल्याची सांगण्यात येत आहे.
यावर्षी सोयाबीन पिकावर येलो मोजॅकचा परिणाम दिसून येत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पिकाचे 70% पर्यंत नुकसान दिसून आलेले आहे. अवेळी झालेला पाऊस तसेच विदर्भातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकामध्ये मोठी घट दिसून येत आहे. भारत देशांमधील जर विचार केला तर यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन हे निश्चितच कमी उत्पादन देणार आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठेतील सोयाबीन भावावर दिसून येत आहे. त्यामुळे तज्ञांनी येणाऱ्या काळात सोयाबीन भाव हे वाढणार असल्याचे सांगितले आहे.
सोयाबीन खरेदी करणारा सर्वात मोठा देश हा चीन असून सोयाबीन उत्पादन करणारे जगातील सर्वात तीन मोठे देश म्हणजे अमेरिका, अर्जेंटिना, ब्राझील हे आहे. जागतिक बाजारपेठेवरील आवक जावक वरून सोयाबीन भाव हे कसे राहतील ते ठरवतात. त्यामुळे जागतिक बाजारपेठेचा परिणाम निश्चित बाजारपेठेवर दिसून येत असतो.
वर्ष 2021 मध्ये भारतीय बाजारपेठे मधील सोयाबीन बाजार भाव हे 10,000 रु. प्रतिक्विंटल पार करून पुढे गेले होते. शेतकऱ्यांना यावर्षी देखील सोयाबीन भाव हे निश्चितच वाढतील अशी आशा आहे. 2021 वर्षी सरकारने पुढे काही निर्णय घेऊन सोयाबीन बाजार भाव नियंत्रणात आणले.
7 ऑक्टोबर 2023 पर्यंत सोयाबीन बाजारभाव साधारण 5000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत चालू आहेत. परंतु येणाऱ्या काळात निश्चितच हे भाव वाढणार असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे.

1 thought on “soybean bhav : ऑक्टोबर 2023 यंदा सोयाबीन जाणार 10,000 पार बघा येथे”