Rain update:राज्यातील या भागात पुढील तीन दिवस अति मुसळधार rain updateबघा येथे

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील यंदाचा पावसाळा हा अतिशय निराशा जनक. आतापर्यंत पाहायला मिळाला.परंतु आता काहीसा दिलासा शेतकऱ्यांना मिळाला आहे. राज्यातील हवामान तज्ञांच्या मते पाऊस तूट भरून काढेल. व सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये समाधानकारक पाऊस पडेल. राज्यातील विविध भागांमध्ये खरीप हंगामातील पिके हे संपूर्णपणे जळून गेलेली आहेत. तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये पिकांना पाण्याची अत्यंत गरज होती. त्यामध्ये एक आनंदाची बातमी आली की, पश्चिम बंगाल सागरामध्ये चक्री वादळ निर्माण होऊन. राज्यामध्ये पावसाला पोषक वातावरण होणार आहे. याविषयी आपण खाली सविस्तर जाणून घेऊया.

Maharashtra rain update

  • रविवारी मुंबईसाठी येलो अलर्ट.
  • मराठवाडा व विदर्भात पडणार मुसळधार.
  • राज्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार नाही.
  • L NINO मुळे यंदा थंडी जास्त.
September 2023 hawaman andaz सप्टेंबर हवामान अंदाज

राज्यात पुढील तीन दिवस पाऊस बरसणार आहे. महाराष्ट्रातील सर्वच भागांमध्ये आज म्हणजेच दिनांक 08/09/ 2023  रोजी सर्व राज्यभर पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.राज्यामधील  पाऊस हा कर्नाटक ,केरळकडून येणार असून तो कोल्हापूर, सांगली, सोलापूर,बीडचा दक्षिणेकडील भाग उस्मानाबाद,हिंगोली,नांदेड या ठिकाणी जास्त बरसणार आहे.मराठवाडा व विदर्भात याचा जास्त प्रभाव असणार आहे.

Rain Update News

राज्यात रब्बी हंगाम समाधानकारक राहणार असल्याचे हवामान तज्ञ यांनी सांगितलेले आहे.यात त्यांच्या मते रब्बीतील पिकांना पेरणी पासून पहिले दीड महिना खरिपात पडलेल्या पावसाच्या ओलीची मदत होते.व नंतर रब्बीतील पीक संपूर्णपणे पडणाऱ्या  हिवाळ्यातील थंडीवर अवलंबून असते. यावर्षी देशाच्या हवामानावर L NINO चा प्रभाव राहणारा असून,यावर्षी महाराष्ट्रामध्ये थंडीचे प्रमाण चांगले राहणार असल्यामुळे रब्बीतील पिके निश्चित लाभ देणार आहेत.

L NINO marathi mahiti

L NINO हा साधारण पाच ते सात वर्षातून एकदा येतो. यामध्ये पाऊस हा अतिशय कमी पडतो. याचा कालावधी आठ महिन्यांचा असतो.याचा प्रभाव महाराष्ट्र राज्यामध्ये सप्टेंबर ते मार्च पर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

हवामान खात्यातील प्रसिद्ध हवामान तज्ञ तसेच निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी शेतकऱ्यांना खास आवाहन केलेले आहे. हवामान खात्याविषयी अपप्रचार केला जातो. शेतकऱ्यांनी हवामान अंदाज खाजगीत न बघता शासनाने दिलेल्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवावा. शासकीय हवामान अंदाज खात्रीशीर रित्या व सर्व पारदर्शक अभ्यास करून दिलेला अंदाज असतो असे त्यांनी सांगितले.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला