नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील रब्बी पिकाला सुरुवात झालेली आहे. रब्बी हंगामातील पिक विमा शासनातर्फे जाहीर करण्यात आलेला आहे. खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना शासनातर्फे 1 रुपयांमध्ये पिक विमा योजना राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याच्या आव्हान केले होते. यावर्षी रब्बी हंगामातील पिकांना सुद्धा 1 रुपयांमध्ये भरता येणार आहे.रब्बी हंगामातील कुठल्या पिकांना मान्यता मिळाली आहे. हे आपण खाली सविस्तर मध्ये जाणून घेऊयात. तसेच 1 रुपये मध्ये पिक विमा याची शेवटची तारीख Rabbi pik vima last date देखील आपण बघणार आहोत.चला तर मग जाणून घेऊयात रब्बी हंगामातील पिक विमा माहिती.
rabbi pik pera 2023 रब्बी पिक पेरा 2023
रब्बी हंगामामध्ये लागणारा rabbi pik pera 2023 खाली आपण पीडीएफ फाईल मध्ये दिलेला आहे. तो डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रब्बी पिक पेरा 2023 डाऊनलोड करावा.
rabbi pik pera 2023 रब्बी पिक पेरा 2023 PDF FILE
Rabbi pik 2023 रब्बी पिक
रब्बी हंगामातील 2023 मध्ये पुढील पिकांना पिक विमा उपलब्ध झालेला आहे. यामध्ये रब्बी ज्वारी, गहू बागायती, हरभरा, कांदा व इतर पिके प्रविष्ट करण्यात आलेली आहे. तसेच उन्हाळी भात, भुईमूग यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
Rabbi pik vima last date रब्बी पिक विमा 2023 शेवटची तारीख
रब्बी पिक विमा शेतकऱ्यांसाठी चालू झालेला आहे. यावेळी शासनाकडून खरीप हंगामा सारखाच रब्बी हंगामा मधील पिक विमा देखील 1 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार आहे.रब्बी हंगामातील ज्वारीला पिक विमा शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2023 आहे.तर गहू बागायती, हरभरा, कांदा व इतर पिकांसाठी शेवटची तारीख ही 15 डिसेंबर असणार आहे. तसेच उन्हाळी भात, भुईमूग या पिकांसाठी 31 मार्च 2023 ही शेवटची तारीख असणार आहे.