नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या रब्बी हंगामातील सर्व पिकांच्या हमीभाव बघणार आहोत. Rabbi MSP 2024-25 मध्ये शेतकऱ्यांना हमीभाव वाढीची आशा होती. ती केंद्र सरकारकडून पूर्ण झालेली आहे का? ते आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये सरकारकडून सर्वात जास्त हमीभाव हा मसूरला देण्यात आलेला आहे. यावेळी शेतकरी हा खरीपमध्ये निसर्गाने साथ न दिल्यामुळे आर्थिक टंचाईमध्ये आहे.
रब्बीमध्ये पाण्याचा तुटवडा व आर्थिक टंचाई या दोन्हींचा सामना करून शेतकऱ्यांना पिकावर लक्ष द्यायचे आहे. केंद्र सरकारने हंगाम 2024-25 साठी रब्बी rabbi crops पिकाचे हमीभाव जाहीर केले. यात महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाचं असणाऱ्या रब्बी हंगामातील हरभरा हे पीक यामध्ये शासनाने हमीभावामध्ये समाधानकारक वाढ केली नसल्याची काही शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत. तर चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण पिकांचे हमीभाव वाढ.
Msp increased on rabbi crops केंद्र सरकारकडून हमीभावात वाढ
केंद्र सरकार कडून हमीभाव जाहीर करण्यात आलेले आहेत.रब्बी हंगामातील सर्वात जास्त हमीभाव वाढ ही मसूर पिकाला 425 रुपयांची जाहीर करण्यात आलेली आहे.त्याप्रमाणे गव्हाच्या हमीभावात 150 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे.Rabbi crops रब्बी हंगामातील सहा पिकांच्या हमीभावात लक्षणीय वाढ झाली आहे.
हरभरा या पिकाच्या हमीभावामध्ये 105 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे. तर जवस या पिकाला 115 रुपये इतकी वाढ मिळाली आहे.मोहरी या पिकाला 200 रुपये हमीभाव झाली आहे. तसेच करडईला 150 रुपये वाढ मिळाली आहे.
Rabbi crops रब्बी हंगाम पिके
रब्बी हंगामातील Rabbi crops तर महत्त्वाच कडधान्य पीक आहे मसूर. मसूरच्या हमीभावा मध्ये केंद्र सरकारने यंदा चांगलीच वाढ केलेली आहे.काही जाणकारांच्या मते या मागचे कारण असे की,मागील काही महिन्यांपासून तुरीच्या भावामध्ये वाढ झालेली दिसून येत आहे. व येणाऱ्या काळातही तुरीचे उत्पादन घटून मागणी जास्त असणार आहे.त्यामुळे सरकारतर्फे तुरीला काही प्रमाणामध्ये पर्याय म्हणून मसुर या कडधान्य पिकाकडे बघितले जात आहे.

केंद्र सरकारने हमीभाव जाहीर करताना असेही जाहीर केले की, हमीभाव जाहीर करताना शासनाने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल. अशाच पद्धतीचे हमीभाव जाहीर केले आहेत.यामध्ये शेतकऱ्यांचा नफा वाढीचा निर्णय देखील घेण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.

1 thought on “new msp for rabbi crops : केंद्र सरकारकडून या पिकांना रब्बी हंगामात भरपूर हमीभाव बघा येथे ”