pune ganpati : अयोध्या राम मंदिर,उज्जैन महाकालेश्वर,गणपती देखावा,मानाचे गणपती,बघा येथे

पुण्यामधील मानाचे पाच गणपती व त्यांचे देखावे. आपण आज बघणार आहोत. तसेच पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती देखावा बघणार आहोत. देशाभरातूनच नव्हे तर जगभरातून गणेश भक्त पुण्याला बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी येत असतात. गणपतीचे दहा दिवस पुण्यामध्ये अगदी उत्साहात ढोल ताशांच्या गजरात बाप्पांचे आगमन ते विसर्जनापर्यंत मोठा भव्य दिव्य असा सोहळा संपन्न होत असतो. पुण्यातील पाच मानाचे गणपती व त्या पाठोपाठ इतर सर्व  मंडळे आपले देखावे गणेश भक्तांसाठी सादर करत असतात.पुण्यातील पाच मानाचे गणपती व इतर सर्व गणपतींचे देखावे आपण खाली बघणार आहोत.

Kasba ganpati कसबा गणपती ( मानाचा पहिला गणपती)
kasba-ganpati-pune
kasba ganpati manacha pahila ganpati

कसबा गणपती हा पुण्यातील मानाचा पहिला गणपती आहे.जो की पुण्यातील कसबा पेठ मध्ये आहे. यावर्षी ढोल ताशांच्या गजरात श्री कसबा गणपती बाप्पांचे आगमन झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वाराणसी हून आलेल्या पंडितांच्या हस्ते श्री कसबा गणपती आरती करण्यात आली. या महाआरतीच्या निमित्ताने वाराणसीच्या मंगलमय वातावरणाचा अनुभव पुण्यात घेता आला. वाराणसी येथील गंगा घाटावरील खड्या स्वरातील गंगा आरती म्हणजे  भक्ती आणि अध्यात्माची विलक्षण अनुभूती. यावर्षीही गणेश भक्तांना हा अनोखा अनुभव घेता आला.

Tambadi jogeshwari तांबडी जोगेश्वरी ( मानाचा दुसरा गणपती)
tambadi-jogeshwari-ganpati
tambadi-jogeshwari-manacha dusra ganpati

तांबडी जोगेश्वरी हा पुण्यातील मानाचा दुसरा गणपती आहे.पुण्यातील आप्पा बळवंत चौक मध्ये विराजमान आहे.यावर्षी मोठ्या उत्साहात गणेश भक्तांनी तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचे आगमन केले आहे. यावर्षी 2023 मध्ये मंडळानी  मुदल पुराणातील गणपतीची विविध रूपे साकारली आहे. यामध्ये गणपती बाप्पांचे वाहन व रूप हे अतिशय सुंदर पद्धतीने दाखवण्यात आलेले आहे. गणपती बाप्पांचे विविध रूपे व त्यांचे वाहन हे खालील दिलेली आहे.

Guruji talim  गुरुजी तालीम (मानाचा तिसरा गणपती)
guruji-talim-ganpati
guruji talim manacha tisra ganpati

गुरुजी तालीम हा पुण्यातील मानाचा तिसरा गणपती आहे. हा गणपती लक्ष्मी रोडवर आहे. यावर्षी 2023  मध्ये गुरुजी तालीम मंडळातर्फे तिरुपती बालाजी येथील बालाजी मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतिकृतीची सजावट करण्यात आली आहे. अतिशय छान पद्धतीने सादर करण्यात आलेले बालाजी मंदिर गणेश भक्तांना आनंदीत करत आहे.

Tulshibaug ganpati तुळशीबाग गणपती (मानाचा चौथा गणपती)
tulshibaug-ganpati
tulshibaug manacha chautha ganpati

तुळशीबाग गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे. गणपती बाप्पा हे तुळशी बागेत विराजमान आहेत.श्री तुळशीबाग मंडळानी यावर्षी गणेशोत्सवात बारा ज्योतिर्लिंगातील एक उज्जैन येथील श्री महाकालेश्वर  मंदिराचे गर्भगृह साकारले आहे. त्या मंदिरातील सर्व विधी नित्य नियमाने दहा दिवस होणार आहे. त्यामुळे तुळशी बागेला भेट देऊन.  उज्जैन येथील महाकालेश्वर चे दर्शन व तुळशीबाग गणपती दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे.

Kesariwada ganpati केसरी वाडा गणपती (मानाचा पाचवा गणपती)
kesariwada-ganpati
kesariwada ganpati manacha pachva ganpati

केसरी वाडा गणपती हा पुण्यातील मानाचा पाचवा गणपती आहे.गणपती बाप्पा आहे नारायण पेठेत विराजमान आहेत. ह्या गणपतीचे विशेष महत्त्व म्हणजे लोकमान्य टिळक यांनी 1893 मध्ये  स्वतःच्या घरी म्हणजे केसरी वाड्यामध्ये या गणपती बाप्पांची स्थापना केली. 1894 पासून केसरी वाडा गणपती मंडळ हे स्थापन झाले. दरवर्षीप्रमाणे यावर्षी टिळक पंचांगानुसार गणपती बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरात आगमन झालेले आहे.

Dagdusheth ganpati दगडूशेठ गणपती पुणे
dagdusheth-ganpati
dagdusheth ganpati pune

पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपती देखावा 2023 हा राम मंदिर अयोध्या हा आहे. अतिशय भव्य दिव्य असा हा देखावा गणेश भक्तांना अनंत उत्साह देत आहे. हुबेहूब असा हा देखावा खूप सुंदर पद्धतीने सादर करण्यात आला आहे. देशभरातून नव्हे तर जगभरातून  मोठ्या संख्येने गणेश भक्त पुण्याला येत आहेत.

dagdusheth ganpati decoration दगडूशेठ गणपती पुणे देखावा
dagdusheth-ganpati-decoration
ayodhya ram mandir decoration
tulshibaug ganpati decoration तुळशीबाग गणपती देखावा
tushibaug-ganpati-dekhava
tulshibaug ganpati decoration
ganpati decoration pune पुणे गणपती देखावा

2 thoughts on “pune ganpati : अयोध्या राम मंदिर,उज्जैन महाकालेश्वर,गणपती देखावा,मानाचे गणपती,बघा येथे”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला