राज्यात पोखरा योजना टप्पा 2 साठी राज्य शासनाची मंजुरी नवीन जिल्हे समाविष्ट.
राज्यातील अनेक शेतकरी ज्या योजनेची वाट पाहत होते, ती योजना म्हणजे पोखरा 2.0 राज्यात नव्याने उभारण्यात येण्यासंदर्भातील आपण आज नवीन अपडेट आली आहे ती बघूया, मंत्रिमंडळात झालेल्या बैठकीमध्ये पोखरा योजनेसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहे.
पोखरा योजना या योजनेमार्फत राज्यातील 16 जिल्ह्यात पोखरा टप्पा दोन राबवण्यात येत होती. पण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पोखरा 2.0 ही योजना राबवण्यासाठी मंत्रीमंडळाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे.या योजनेपासून शेतकरी खरोखरच समृद्ध झालेला आहे. या योजनेमध्ये अजून काही जिल्हे समाविष्ट करण्यासाठी देखील मंजुरी देण्यात आलेली आहे.
पोखरा योजना टप्पा 2 अति महत्वाचे
शेतकरी हिताची पोखरा योजना या योजनेमध्ये अजून 5 जिल्ह्याचा समाविष्ट करण्यात आलेला आहे ते 5 जिल्हे म्हणजे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या 5 जिल्ह्यासह ही योजना आता राज्यात 21 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.याविषयी अधिकृत लवकरात लवकर कळवण्यात येणार आहे. या 21 जिल्ह्यातील 5220 गावांमधील पोखरा 2.0 ही योजना राबवण्यात येणार आहे.
आपण जर पाहिल तर या योजनेमध्ये सध्या नवीन अर्ज घेतले जात नाहीत, नवीन अर्ज घेतले तरी ते अर्ज स्वीकारले जात नाही. परंतु या योजनेमधला पहिला टप्पा अजून उर्वरित राहिलेला आहे.बरेच शेतकरी पहिल्या टप्प्यात अजून लाभ घेण्यापासून वंचित आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या योजनेसाठी 4000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती.
पोखरा योजना निधी
राज्य शासनाच्या माध्यमातून 4000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करत असताना ती तरतूद (विदेशी चलन)डॉलरच्या माध्यमातून करण्यात आलेली होती. डॉलरचे रेट वाढल्यामुळे या योजनेमध्ये देखील फारच बदल झालेला आहे. या योजनेमध्ये बदल झाल्यामुळे 690 कोटी रुपयांचा निधी या योजनेमध्ये द्यावा लागणार आहे.याविषयी सविस्तर माहिती अशी की, त्यामध्ये 483 कोटी रुपये जागतिक बँकेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. उर्वरित जो निधी आहे तो राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.असे कळवण्यात आले आहे.
एकंदरीत निधी जागतिक बँक आणि शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. या योजनेमार्फत लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल,अशाच माहिती साठी आत्ताच आमचा WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा..
*******************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
******************************
*************************************
New Update:महाराष्ट्रातील नागरिकांना 600 रुपयात ‘वाळू/रेती तुमच्या दारात’ शासन योजना.
*************************************
4 thoughts on “Pokhara Yojana 2023:राज्यात पोखरा योजनेचा नवीन टप्पा चालू बघा तुमचा जिल्हा आहे का?”