पिठोरी अमावस्या पूजा, मुहूर्त, व्रत,कथा 2023 कशी करायची. पिठोरी अमावस्या का साजरी करतात ? आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पिठोरि अमावस्येला खूप महत्त्वाचे स्थान आहे.त्यादिवशी मातृदिन म्हणून साजरा केला जातो.पिठोरी अमावस्या हे व्रत का करतात तर आपल्या वंशवृद्धीसाठी व आपले सौभाग्य अखंड टिकण्यासाठी हे व्रत केले जाते.त्यादिवशी कशाची पूजा करायची. हे आपण खाली सविस्तर मध्ये जाणूनच घेणार आहोत.Pithori Amavasya मुहूर्त, वेळ व पूजेसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी. आपण बघणार आहोत.जाणून घेऊयात पिठोरी अमावस्या विधी विषयी सर्व काही.
pithori amavasya 2023 date and time
पिठोरी अमावस्या ही 14 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 4:49 am सुरू होऊन 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7:09 am ला संपणार आहे.
pithori amavasya pooja पिठोरी अमावस्या पूजा
पूजेसाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 64 योगिनी असलेली प्रतिमा आपल्याला बाजारांमधून आणायचा आहे.यामध्ये 64 योगिनींचे चित्र असतात.ही प्रतिमा आपल्याला जिथे पूजा करणार आहोत तिथे मध्यभागी ठेवायची आहे. सर्वप्रथम गणेशाचे पूजन करावे. गणेशाला हळदी कुंकू वाहून नमन करावे. अक्षदा, फुल, आघाडा वाहावा. गणेश रायाची पूजा झाल्यानंतर दीप पूजा आपल्याला करायची आहे.
आता आपल्याला 64 योगिनींची पूजा करायची आहे. सर्वप्रथम प्रतिमेला हळदीकुंकू वाहून घ्या.प्रतिमेसमोर पाच सुपाऱ्या व त्याखाली अक्षदा अंतराने मांडायचे आहेत. किंवा पिठाचे पाच गोळे मांडले तरी चालतील. हळदीकुंकू वाहून त्यांचे पूजन करायचे आहे. प्रतिमेला सौभाग्य अलंकार घालून देवीची ओटी भरायची आहे.त्यानंतर खिरीचा, व पीठाने केलेल्या कोणत्याही वस्तूचा नैवेद्य दाखवायचा आहे.
pithori amavasya in marathi
वरील प्रमाणे pithori amavasya marathi पूजा झाल्यानंतर.देवीकडे प्रार्थना करायची की, माझे कुटुंब सुखी ठेव.तसेच बऱ्याच ठिकाणी अशी परंपरा आहे की, पिठोरी अमावस्येच्या दिवशी सायंकाळी लहान मुलांना जेवायला बोलावतात.त्यांना खाण्यास खीर, मोदक दिली जातात. यामध्ये घरातील स्त्री ही पूजेकडे तोंड करून,मोदकाचे ताट डोक्यावर धरतात. व लहान मुले मागे उभे करतात.डोक्यावर ताट धरून बसलेली महिला विचारते. लहान मुलांना कोण आहेस तू? त्यावर तो मुलगा म्हणतो. मी लहान बाळ आहे. व ताटातील मोदक घेतो. अशीही एक परंपरा चालत आलेली आहे.याविषयीची कथा आपण खाली बघणार आहोत.
pithori amavasya story in marathi

आटपाट नगर होत.तिथे गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवस्थेच्या दिवशी त्याच्या वडिलांचे श्राद्ध असायचे.दरवर्षी ज्या दिवशी श्राद्ध असायचे त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेचे पोट दुखू लागे.व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेत बाळंत होऊन पोर मरून जाई.अस झाल की ब्राह्मण तसेच उपाशी निघून जात.असे सलग सहा वर्ष झाल सातव्या वर्षी तसच झाल. सासरा रागावला ते मेलेल पोर तिच्या ओटीत घातल.व तिला तेथून काढून दिले.
ती पुढे अरण्यात गेली.तिथे तिला झोटिंगाची बायको भेटली. तिने विचारले बाई बाई तू कोणाची कोण? इथे येण्याच कारण काय? आलीस तशी परत जा नाहीतर माझा नवरा तुला खाऊन टाकेल. अस ती म्हणाली परंतु ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्या करताच मी इथे आले आहे.हे ऐकून ती म्हणाली तू एवढी जीवावर का उदार झालीस. ब्राह्मणाच्या सुनेने आपली सर्व कहाणी झोटिंगाच्या बायकोला सांगितली. घडलेला प्रकार ऐकून झोटिंगाच्या बायकोने सांगितले की, इथून पुढे सरळ जा तिथे एक बेलाचे झाड व शिवलिंग लागेल. तिथे तू झाडावर बसून रहा. रात्री नागकन्या,देवकन्या साथी अप्सरा घेऊन तिथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील.नैवेद्य दाखवल्यानंतर अतिथी कोण आहे? असे विचारतील. अस विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण. विचारल्यावर ते तुला बघतील कोण कोणाची? म्हणून चौकशी करतील.तेव्हा तू घडलेली सगळी हकीकत सांगून दे.
त्याप्रमाणे ब्राह्मणाची सून शिवलिंगाच्या बाजूला झाडावर जाऊन बसली. रात्री नाक कन्या देवकन्या साथिया अप्सरा घेऊन पूजाला आल्या व पूजा झाल्यानंतर त्यांनी अतिथी कोण म्हणून विचारले. ब्राह्मणाच्या सुनेने सांगितले की मी आहे अतिथी. व त्यांना घडलेला सगळा प्रकार सांगितला. नागकन्या देवकन्या यांनी ब्राह्मणाच्या सुनेची साथी मुले जिवंत केली. व तिच्या हवाली केली. पुढे तिला हे व्रत सांगितल व 64 योगिनींची पूजा करावयास सांगितली. आसरांनी सांगितल हे व्रत केले तर कुणाचे मूल दगावत नाही व ते सुख समाधानी राहते.पुढे त्यांना नमस्कार करून ती निघाली व आपल्या गावाकडे आली. घरी आल्यानंतर घडलेल्या प्रकाराविषयी तिने ब्राह्मणाला सांगितले.हे ऐकून ब्राह्मण आनंदी झाला व त्यांचे स्वागत केले व गुण्यागोविंदाने राहू लागले.

1 thought on “Pithori Amavasya : पिठोरी अमावस्या 2023 पूजा, मुहूर्त, व्रत,कथा संपूर्ण माहिती बघा येथे”