नमस्कार शेतकरी मित्रांनो,आपण बघतच असाल राज्यातील जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यात काही जिल्ह्यांमध्ये तर 21 दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेला आहे.यामुळे संभाव्य उत्पादनावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.यावेळी पावसाने उशीर केल्यामुळे राज्यात 91 टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या. मात्र, जुलै च्या तिसऱ्या आठवड्यानंतर राज्यातील तेरा तालुक्यांमधील 53 मंडळ मध्ये पावसाने 22 ते 25 दिवसांचा खंड दिला आहे.याचा थेट परिणाम सोयाबीन, तूर, कापूस, भात या महत्त्वाच्या पिकावर झालेला दिसून येत आहे. यात महत्त्वाचे म्हणजे 21 दिवस सांपेक्षा जास्त पावसाचा खंड आल्यास तातडीची नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाईच्या 25%टक्के रक्कम आगाऊ दिली जाते.त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
राज्यातील हवामान परिस्थिती
- बहुतांश जिल्ह्यात 22 ते 25 दिवसांचा पावसाचा खंड.
- 25% नुकसान भरपाई चा सर्वेक्षणाचा आदेश.
- राज्यातील 13 जिल्हे यात समाविष्ट.
- राज्यातील खरीप पिकांसोबत रब्बी ही धोक्यात.
प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजना नुकसान भरपाई 2023
प्रधानमंत्री खरीप पिक विमा योजनेत राज्याने यंदा एक रुपयांमध्ये पिक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर पावसाचा खंड 21 दिवसांपेक्षा जास्त झालेला आहे. असे झाले असल्यास शेतकऱ्यांना तातडीची नुकसान भरपाई म्हणून विमा नुकसान भरपाई च्या 25% रक्कम आगाऊ दिली जाते.यात कृषी आयुक्तांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
Pik vima anudan 2023 खरीप पिक विमा नुकसान भरपाई 2023
यामध्ये ज्या जिल्ह्यातील किंवा मंडळामधील काही गावामध्ये देखील 21 दिवस पावसाचा खंड होऊन गेलेला आहे. तरीदेखील यादीमध्ये त्या मंडळाचे नाव आलेले नसल्याचे शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे.यात Pik vima anudan 2023 खरीप पिक विमा नुकसान भरपाई 2023 बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की, मदत सरसकट,सढळ हाताने शासनाने करावी. कारण राज्यातील काही भाग सोडला तर संपूर्ण राज्यभर समाधानकारक पाऊस झालेला नाही. व खरीप सोबत रब्बीचे पिके देखील धोक्यात येण्याची संभावता नाकारता येणार नाही.
21 दिवसांपेक्षा जास्त पाऊस खंड असलेली मंडळे
या जिल्ह्यातील मंडळे 21 दिवसांपेक्षा जास्त पाऊस खंड असलेली आहेत.अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बुलढाणा, जळगाव, जालना, नाशिक, परभणी, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील काही ठराविक मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा जास्त पाऊस खंड आहे.