नमस्कार शेतकरी मित्रांनो,यावर्षी शासनाने सांगितल्याप्रमाणे खरीप हंगामातील पिक विमा हा 1 रुपया मध्ये काढून मिळणार आहे.परंतु हा खरीप हंगामातील पिक विमा मिळवण्यासाठी आपल्याला अजून एक काम करायचे आहे ते म्हणजे ई-पीक पाहणी. ई-पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या सात बारा वरील नोंद ही स्वतः करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे ई-पीक पाहणी मध्येसामायिक क्षेत्रातील शेतकऱ्यांना सुद्धा आपली पिक नोंदणी स्वतः करता येणार आहे.शासनाच्या ई-पीक पाहणी धोरणामुळे नक्कीच शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे शेतकरी स्वतःच्या पिकाची नोंद स्वतः करणार आहे.ई-पीक पाहणी कशी करायची व त्यासाठी कोणते ॲप वापर करायचे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
ई-पीक पाहणी तर महत्वाची आहेच. पण यासोबत क्रॉप इन्शुरन्स क्लेम हे देखील महत्त्वाचे आहे.क्रॉप इन्शुरन्स क्लेम जर आपण केले नाही. तर आपल्या पिकाचे नुकसान गृहीत धरले जाणार नाही. नैसर्गिक आपत्तीमुळे आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासाच्या आत आपल्याला क्लेम करायचा आहे. याची संपूर्ण माहिती आपण खाली बघणार आहोत.
ई-पीक पाहणी माहिती
- 7\12 वर पीक स्वतः नोंदवता येणार.
- सामायिक क्षेत्रात स्वतंत्र नोंद करता येणार.
- थोड्याच दिवसात ई-पीक पाहणी शेवटचा दिवस.
- ई-पीक व्हर्जन 2 ॲप हाताळण्यास सोपे.
क्रॉप इन्शुरन्स क्लेम माहिती
- पिकाचे नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत क्लेम करणे आवश्यक.
- crop insurance app यावर नुकसान झालेल्या पिकांचे फोटो अपलोड करणे.
- क्लेम केल्यानंतर कंपनीचा माणूस शेतात येऊन नुकसानाची पाहणी करणार.
- आपल्या नुकसानाचे क्लिअर फोटो अपलोड करणे.
शासनाने सर्व शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की, खरीप हंगामातील ई-पीक पाहणी व क्रॉप इन्शुरन्स क्लेम आवश्यक आहे. ई-पीक पाहणी जर नसेल तर आपल्या 7\12 वर पीक लावण्यात येणार नाही. आणि याचा फटका शेतकऱ्यांना पिक विमा मध्ये बसेल. जर आपण ई-पीक पाहणी केली नाही तर पिक विमा ही मिळणार नसल्याच सांगण्यात येत आहे.ई-पीक पाहणी व क्रॉप इन्शुरन्स क्लेम कसे करायचे हे आपण बघूया.
पिकाचे नुकसान झाल्यावर 72 तासात क्लेम करणे
शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याचशा गोष्टी बदलल्या आहेत. पहिल्यासारखे पिक विमा भरले की झाले. असे आता नाही. आपले पिकाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास. पिक विमा कंपनीस आपल्याला 72 तासांच्या आत ते कळवायचे आहे. आणि ते बंधनकारक आहे.crop insurance ॲप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवावे. आपत्तीमुळे आपल्या पिकाचे नुकसान झाल्यास. या ॲप वर जाऊन आपण स्वतः ते 72 तासाच्या आत क्लेम करावे म्हणजे आपल्याला पीक विम्याचा लाभ मिळेल. crop insurance हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
crop insurance app क्रॉप इन्शुरन्स ॲप CLICK HERE
ई-पीक पाहणी कशी करायची ?
ई-पीक ॲप मध्ये सर्वात प्रथम आपल्या मोबाईलची लोकेशन ऑन करावे.महसूल विभाग निवडावा.नवीन असाल तर खातेदार नोंदणी करून पुढे जावे.पिक माहिती नोंदवा या ऑप्शन वर क्लिक करून शेताच्या मध्यावर उभा राहून पिकाचा क्लिअर फोटो काढून अपलोड करणे.म्हणजे 7/12 वर आपल्या पिकाची नोंद घेतली जाईल.
ई-पीक व्हर्जन 2 ॲप प्ले स्टोअर वर डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE.
ई-पीक पाहणी शेवटची तारीख ?
शासनाने सांगितल्याप्रमाणे ई-पीक पाहणी शेवटची तारीख ही 31 जुलै 2023 ही सांगण्यात आली होती.शासनाने पीक नोंदणीसाठी मुदत वाढवून दिलेले आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद करून घ्यायचे आहे. ई-पीक पाहणी नाही केल्यास पिक विमा व शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळणार नाही.त्यामुळे वरील ई-पीक पाहणी ॲप e pik pahani app डाऊनलोड करून आपली पिके सातबारावर नोंदवून घ्यायचे आहेत.
1 thought on “या दोन गोष्टी केल्या तरच मिळणार पीक विम्याचा लाभ”