महाराष्ट्र शासनाने यावेळी शेतकरी राजाचे ओझे हलके करण्याचा विचार करून एक रुपयात पिक विमा या योजनेचा शुभारंभ केलेला आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांना पिक विमा भरणे सोयीस्कर झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व शेतकऱ्यांना पिक विमा भरण्याचे आवाहन केले आहे.
शेतकरी राजा न आलेल्या पावसामुळे व दुबार पेरणीमुळे आधीच संकटात आहे. त्यात पिक विमा भरणे त्याला कठीण झाले असते. त्यामुळे एक रुपयात पिक विमा याचा लाभ सर्वांना होणार आहे.
काही जिल्ह्यात पिक विमा भरण्यास सुरुवात झाली आहे. तर काही जिल्ह्यात लवकरच सुरुवात होणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपला पिक विमा वेळेत भरून घ्यावा.
शेतकरी मित्रांनो, यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?
यासाठी शेतकऱ्याकडे जमिनीचा ७/१२ नंतर ८/अ, बँक पासबुक पिकपेरा आणि नंतर मोबाईल नंबर, आधार क्रमांक. हे सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्ही तुमच्या जवळील CSC सेंटर वर जाऊन 1 रुपयात तुमच्या शेतीपिकाची नोंद करू शकता. म्हणजेच 1 रुपयात पिकविमा भरू शकता.
**********************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
*********************************
*********************************
New Update:महाराष्ट्रातील नागरिकांना 600 रुपयात ‘वाळू/रेती तुमच्या दारात’ शासन योजना.
********************************