वेळेआधीच केस पांढरे होण्याची खूप कारणे आहेत.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या केसांचा काळा रंग हा मेलानिन नामक पिगमेंटमुळे असतो. हे पिगमेंट केसांच्या मुळाशी असतात. जेव्हा मेलानिन बनणे बंद होते तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. pandhare kes upay वेळ आधी केस पांढरे होण्याची काही महत्त्वाची कारणे आपण बघूया.
केस पांढरे होण्याची काही कारणे
प्रमाणापेक्षा जास्त तणाव घेतल्यास किंवा तणावपूर्ण वातावरणात काम केल्यास, केस लवकर पांढरे होतात.
डिप्रेशन, गरजेपेक्षा जास्त अँटिबायोटिक औषध घेतल्यामुळेही केस पांढरे होतात.
वेळेपूर्वी केस पांढरे होण्याचे एक कारण अनुवंशिकता आहे. तुमच्या आई अथवा वडिलांचे केस लवकर पांढरे झाले असतील तर तुमचेही केस लवकर पांढरे होतात.
शरीरामध्ये प्रोटीन, लोह, व्हिटॅमिन बी १२ अशा पोषक तत्त्वांची कमतरता असल्यास, केस पांढरे होऊ लागतात.
वाढते प्रदूषण आणि धूळ – मातीच्या सतत संपर्कात आल्यामुळेही केसांचा काळेपणा निघून जातो आणि केस पांढरे होतात.
केसांमध्ये विविध केमिकलयुक्त क्रीम लावल्यास किंवा हेअर कलर केल्यामुळेही केस पांढरे होतात. त्याशिवाय स्ट्रेटनिंग आणि कर्लिंग मशीनचा जास्त उपयोग केल्यास, केसांना नुकसान पोचते आणि केस पांढरे होऊ लागतात.
अल्कोहल, धूम्रपान इत्यादी जास्त घेतल्यामुळेही केस पांढरे होतात. यापासून दूर राहणेच जास्त चांगले.
केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय,केस पांढरे न होण्यासाठी काय करावे?
प्राचीन काळापासून कांद्याचा वापर आयुर्वेदात केला जातो. कांद्याचा रस एक ते दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा खोबरेल तेल हे एकत्रित करून संपूर्ण डोक्याला केसांना पाच मिनिटं मसाज करावा लागेल आणि नंतर पंधरा ते वीस मिनिटांनी किंवा अर्ध्या तासाने केस धुवून टाकावेत असं नियमित केल्याने फायदा होतो असं आठवड्यातून तीन ते चार वेळा करावे.नियमित केल्याने केस काळेभोर आणि दाट तर होतीलच पण त्याचबरोबर केस गळणे देखील थांबेल.
रोज रात्री झोपण्याआधी एक चमचा त्रिफळा चूर्ण गरम पाण्याबरोबर घेतल्याने फायदा होतो याने हळूहळू सफेद केसांचे प्रमाण कमी होतं. आणि केस गळणे थांबतात काही दिवसातच केस काळे होतील.
जर आपल्याला क्विकली केस काळे हवे असतील.तर एक मग पाण्यामध्ये दोन चमचे आवळ्याचा पावडर आणि एक चमचा कॉफी पावडर घालावी आणि रात्रभर हे पाणी भिजत ठेवावं आणि सकाळी केस धुवून शेवटच्या मग मध्ये हे पाणी घ्यावं आणि केसांवर ओतून घ्यावं आठवड्यातून किमान दोन-तीन वेळा अशा प्रकारे केसांना केलं तर केसांवर छान रंग चढतो.
आवळा आणि लिंबूचा हेअर पॅक देखील केस काळे करण्यासाठी खूपच उपयुक्त ठरतं त्यातल्या अँटीऑक्सिडेंट अंटी बॅक्टेरियल आणि आपल्या शरीरातून विषारी घटक निघून जाण्यास मदत होते. याने केसांचं आरोग्य ही सुधारतं एक वाटी आवळा पावडर एका लिंबाचा रस आणि लागेल तितकं पाणी घालून आणि एका तासानंतर पूर्ण केसांवर ही पेस्ट लावून थोडा मसाज करावा त्यानंतर वीस पंचवीस मिनिटानंतर शाम्पू न लावता केस धुवून काढावेत आठवड्यातून दोन-तीन वेळा असं केल्याने केस काळेभोर होण्यास मदत होईल.
**************************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
**************************************
***********************************