New Virus:बँक अकाउंट खाली व्हायच्या आत हे ॲप तुमच्या मोबाईल मधून अनइन्स्टॉल करा

शेतकरी मित्रांनो आपण नेहमीच गुगल प्ले स्टोअर वरून अनेक प्रकारचे ॲप डाऊनलोड करतो.परंतु ही कृती धोकादायक ठरू शकते.त्याची कल्पना तुम्हाला ही बातमी वाचून येऊ शकते.इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने एक विशिष्ट स्पायवेअर शोधला आहे.हा स्पायवेअर केवळ ईमेल किंवा इतर माहितीची चोरीच नाही करत तर फोनच्या कॅमेऱ्याचा वापर करून त्याचे रेकॉर्डिंग ही करतो.घरात फोन ठेवला त्या जागेवरून आजूबाजूचे संभाषण ऐकतो.हा स्पायवेअर देशातील 42 कोटी अँड्रॉइड फोन पर्यंत पोहोचला आहे.त्याचे नाव स्पिन ओके आहे.तो गुगल प्ले स्टोअर मधील 105 ॲप च्या साह्याने फोनपर्यंत पोहोचला आहे.हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना मोबाईल फोन मधील संशयित आपला हटवण्याचे निर्देश दिले.चला तर मग बघूया या विषयी पूर्ण माहिती.

डिलीट केलेला कंटेंट ही स्वतःच मिळवतो

आयटी मंत्रालयांच्या सूत्रानुसार ‘स्पिन ओके’ अतिशय धोकादायक आहे.अतिशय कमी वेळात ते 42 कोटी फोन पर्यंत जाऊन पोहोचले आहे.हा स्पायवेअर ॲपच्या साह्याने फोन मध्ये येतो आणि नंतर जावा स्क्रिप्ट कोड च्या मदतीने हळूहळू क्षमता वाढवतो.फोन मधील डेटा ची कॉपी करून त्याला अज्ञात रिमोट सर्वर रूम पर्यंत पोहोचवतो.एवढेच नव्हे तर फोन मधून डिलीट केलेल्या फाइल्स ला देखील पुन्हा मिळू शकतो.फोन मधील फाइल्स मध्ये बदलही करू शकतो.फोन मधील कॅमेराचा आपोआप वापरही करू शकतो.

फोनमध्ये स्पायवेअर आहे की नाही, हे कसे ठरवावे?

वेगवेगळ्या तज्ञांनी या स्पायवेअर पासून संरक्षण करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.अनेकदा आपल्या फोनमध्ये वारंवार जाहिराती आकारान सुरू होतात.त्यावरून तुमच्या फोनमध्ये स्पायवेअर असण्याची शक्यता आहे.म्हणूनच गेल्या काही महिन्यात डाउनलोड केलेल्या आपला अनइन्स्टॉल करणेच हिताचे ठरेल.

सुरक्षेसाठी काय करावे ?

सर्वात आधी अँड्रॉइड फोन मध्ये अँटीव्हायरस आणि अँटी स्पायवेअर डाऊनलोड करा.

कोणतेही संकेतस्थळ किंवा ॲप सुरू होणाऱ्या जाहिरातीला क्लिक करू नका.

ई-मेल किंवा इतर माध्यमातून येणारे लिंक वर क्लिक करू नका.

गुगल प्ले स्टोअर मधून कोणताही ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याचा रिव्ह्यू जरूर वाचा.

विश्वसनीय नसलेल्या वेबसाईटला डाऊनलोड करू नये.

अँड्रॉइड फोन ला वेळोवेळी अपडेट करत रहा.

या ॲप्समध्ये धोकादायक स्पायवेअर 

ऑनलाइन कॅश रिवॉर्ड,गेम्स, फिटनेस, व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ मेकिंग, गुंतवणुकी सारख्या सेवांचे दावे करणारे ॲपमध्ये स्पायवेअर पोहोचते.

त्यापैकी दहा प्रमुख:

नाईस व्हिडिओ एडिटर,जापया,बीयुगो,एमव्ही  बीट,क्रेझी ड्रॉप्स,टिक,कॅश जॉईन,कॅश गेम,फिजो नोवेल चा समावेश आहे.जापया व नाईस व्हिडिओ एडिटर चे दहा कोटी यूजर आहेत.बीयुगो,एमव्ही  बीट चे देखील पाच कोटी म्हणून जास्त युजर आहेत.कॅसिनो रॉयल, लकी वर्ल्ड कप, कॅंडी गॅस, मेम गुरु यासारखे एकूण 105 संशयित ॲप आहेत. तर मित्रांनो या धोकादायक ॲप पासून आपल्या मोबाईलचा बचाव आपल्याला करायचा आहे.

************************************

shasan aplya dari yojana

**********************************

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला