नमस्कार मित्रांनो, नवरात्र हा सण भारतातील विविध भागात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.अश्विन महिन्याच्या पहिल्याच दिवशी नवरात्र उत्सवाला navratri 2024 सुरुवात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सार्वजनिक मंडळामध्ये देवीची मूर्तीची स्थापना केली जाते. आज आपण नवरात्रीचे नऊ दिवस उपवास, पूजा, व्रतवैकल्य या सर्व गोष्टी जाणून घेणार आहोत. नवरात्रीचे नऊ दिवस प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या रंगांच्या साड्या देवीला नेसवल्या जातात. देवीप्रमाणे सर्व स्त्रिया ही नऊ दिवस नऊ रंगाच्या साड्या नेसतात.नवरात्र हा सण गुजरात, ओडिसा, कलकत्ता, बिहार, आसाम मध्ये मोठ्या प्रमाणात दुर्गा पूजेचे आयोजन करून साजरा केला जातो.नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवसाचे एक विशेष महत्त्व असते. ते देखील आपण खाली बघणार आहोत. नऊ दिवसाच्या नऊ माळी प्रत्येक माळेला एक अनन्य साधारण महत्व. चला तर मग जाणून घेऊया navratri नवरात्री विषयी सर्व काही.
navratri 2024 date नवरात्री 2024 दिनांक
नवरात्री 2024 ची सुरुवात ही ऑक्टोबर मध्ये होत आहे. 3 ऑक्टोबर 2024 गुरुवारी नवरात्रीला सुरुवात होत आहे. या दिवशी नवरात्रीचा पहिला दिवस असणार आहे.
navratri colour in marathi navratri 2024 colours marathi नवरात्री नऊ दिवसाचे रंग, माळ, मराठी माहिती
navratri first day नवरात्री पहिला दिवस
नवरात्रीची सुरुवात 3 ऑक्टोबर 2024 गुरुवार रोजी सुरू होत आहे. या दिवशी नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी रंग हा पिवळा आहे.या दिवशीचा शुभ रंग हा ज्ञानाचे प्रतीक दाखवणारा पिवळा रंग हा आहे.
navratri second day नवरात्री दुसरा दिवस
नवरात्रीचा दुसरा दिवस 4 ऑक्टोबर 2024 रोजी शुक्रवार या दिवशी येत आहे. या दिवशीचा शुभ रंग हा हिरवा आहे.या दिवशीचा शुभ रंग हा नवीन सुरुवातीचा,ऐश्वर्या वाढीचा हिरवा रंग हा आहे.
navratri third day नवरात्री तिसरा दिवस
नवरात्रीचा तिसरा दिवस हा 5 ऑक्टोबर 2024 रोजी शनिवार हा आहे. या दिवशीचा शुभ रंग हा करडा आहे.या दिवशीचा शुभ रंग हा शांतता, मनमोहकता देणारा करडा रंग हा आहे.
navratri fourth day नवरात्री चौथा दिवस
नवरात्रीचा चौथा दिवस हा 6 ऑक्टोबर 2024 रोजी रविवार हा आहे. या दिवशीचा शुभ रंग हा नारंगी आहे.
navratri fifth day नवरात्री पाचवा दिवस
नवरात्रीचा पाचवा दिवस 7 ऑक्टोबर 2024 रोजी वार सोमवार आहे. या दिवशीचा शुभ रंग हा शांतता प्रसन्नता प्रदान करणारा पांढरा हा रंग आहे..
navratri sixth day नवरात्री सहावा दिवस
नवरात्रीचा सहावा दिवस हा 8 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार रोजी येत आहे.या दिवशीचा शुभ रंग हा सामर्थ्य देणारा सर्वात शक्तिशाली असा लाल रंग हा आहे.
navratri seventh day नवरात्री सातवा दिवस
नवरात्रीचा सातवा दिवस हा 9 ऑक्टोबर 2024 रोजी वार बुधवार येत आहे. या दिवशीचा शुभ रंग हा शाही निळा रंग आहे.
navratri eighth day नवरात्री आठवा दिवस
नवरात्रीचा आठवा दिवस हा 10 ऑक्टोबर 2024 रोजी वार गुरुवार येत आहे.आठव्या दिवशीचा शुभ रंग हा गुलाबी आहे.
navratri ninth day नवरात्री नववा दिवस
नवरात्रीचा नववा दिवस हा 11 ऑक्टोबर 2024 रोजी वार शुक्रवार येत आहे. या दिवशीचा शुभ रंग हा जांभळा आहे.
12 ऑक्टोबर 2024 रोजी दहाव्या दिवशी आपण दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी करत असतो. या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा मानला जाणारा दिवस आहे.या दिवशी पुरणाचा नैवेद्य केला जातो मनोभावे पूजा केली जाते. या प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस मनो भावे देवीची पूजा केली जाते.
देवीने राक्षस महिषासुराचा वध केला म्हणून देवीला महिषासुरमर्दिनी असे सुद्धा म्हटले जाते.महाराष्ट्रातील प्रमुख देवीची ठिकाणे महालक्ष्मी (कोल्हापूर), तुळजाभवानी (तुळजापूर), रेणुका माता (माहूरगड) व अजून इतरही आहेत. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी मोठ्या भक्ती भावाने येतात.
3 thoughts on “navratri 2024 : नवरात्री नऊ दिवसाचे रंग, माळ, नैवेद्य, व्रत संपूर्ण माहिती बघा येथे”