राज्यात 10 जून पासून भाग बदलत पाऊस पडणार. 9 जून 2023 आज पासून चा नवीन हवामान अंदाज आपण सांगितला होता. 2019 ला अशी परिस्थिती झाली होती. 2019 ला मान्सून केरळमध्ये आल्याच्या नंतर चक्रीवादळ तयार झालं होत. समुद्रामध्ये चक्रीवादळ तयार झाल्या नंतर चक्रीवादळ आपल्यासोबत ढगांना सुद्धा घेऊन जात. अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मान्सून पूर्वे कडून दाखल होतो. हीच परिस्थिती या वर्षी २०२३ मध्येहि निर्माण झाली आहे.
पूर्वे कडून दाखल होणार मान्सून महाराष्ट्रात चांगला बरसतो. त्यामुळे या वर्षी २०२३ ला कमी काळात जास्त पाऊस पडणार आहे हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचे आहे. व त्यानुसार शेतीची तयारी करायची आहे.
सर्व शेतकऱ्यांनी येथे लक्षात घ्यायचे आहे कि, चक्रीवादळ आता गुजरात पट्टी वरून जाणार आहे. तर चक्रीवादळ हे फिरत असतानी शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायच आहे. चक्रीवादळाच्या पंख्यात मूंबई व महाराष्ट्रातील भागात पाऊस पडणार आहे म्हणजेच १०जुन,११,१२,१३,१४जुन,२०२३ ला विखुरलेल्या अवस्थेत पाऊस पडणार आहे. तरी शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे.
शेतकऱ्यांनो पाऊस १८जुन२०२३ ते २२,जुन २०२३ ला परत पडणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हा देखील अंदाज घेऊन शेतीचे नियोजन करायचे आहे.
महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांनी एक लक्षात घ्यायचे आहे. जर जमिनीची ओल हाताची १ वित्त (म्हणजे करंगळी शेवटच टोक ते आंगठा शेवटच टोक) नसेल तर पेरणी टाळायची आहे. शेतकरी बंधुनो हि बाब सगळ्यात महत्वाची आहे. १ वित्त जमीन ओली असल्यावरच पेरणी करायची.