लोणावळा हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे.भारतातील फेमस हिल स्टेशन पैकी एक म्हणजे लोणावळा.लोणावळ्याला तुम्ही जायचा जर विचार करत असाल. तर आज आपण तेथील महत्त्वाच्या ठिकाणाची माहिती देणार आहोत. लोणावळ्यात आपण कुठे कुठे फिरू शकतो. खर्च किती या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत.
जर आपण ट्रेनने येण्याचा विचार करत असाल. तर मुंबई पुणे अजूनही देशभरातून आपण लोणावळ्याला येऊ शकतो. लोणावळा स्टेशन वर डायरेक्टली येऊ शकतो.महाराष्ट्रातून जर बसणे येणार असाल. तर लोणावळ्याला डायरेक्टली बस ने येऊ शकतात.चला तर बघूया महत्त्वाचे लोणावळ्यातील ठिकाण.
लोणावळ्यात फिरण्यासाठी आपल्याला कार व स्कुटी रेंट वर मिळत नाही. फिरण्यासाठी आपल्याला कॅब किंवा ऑटो (रिक्षा) स्वस्त दरात उपलब्ध होते.जर तुम्हाला कॅब बुक करायचे असेल तर LonavalaCab या वेबसाईटवर जाऊन बुक करू शकता.
राजमाची पॉईंट,येथून राजमाची किल्ला बरोबर समोर दिसतो.येथे आपल्याला समोरच खूप मोठ्या धबधब्याचे दर्शन होते.निसर्गाचे मनमोहक सौंदर्य आपल्याला येथे अनुभवायला मिळते.
राजमाची गार्डन,हा सनसेट पॉईंट पण आहे.येथून आपल्याला सनसेट पॉईंट सोबत मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा एक मस्त लूक बघायला मिळतो.येथे आपल्याला काही एन्ट्री फीस नाही.
खंडाळा सिन पॉईंट,येथून आपल्याला खंडाळ्या घाटाचा पूर्ण लुक बघायला मिळतो. अक्षरशः खंडाळा घाटाचा ते सौंदर्य मनाला सटका लावून जात. जर तिथे गेल्यावर सूर्यकिरणे असतील तर अजून स्पष्ट दिसते. या खंडाळा सीन पॉईंट ला नक्की भेट द्या.
खंडाळा लेक,एकदम दाट फॉगी वातावरण आपल्याला बघायला मिळते.रिमझिम पावसात येथे मजाच न्यारी.पावसाळ्यात येथे मक्याचे कणीस खाण्यास तुडुंब गर्दी भरलेली असते.
सुनील वॅक्स म्युझियम,येथे आपल्याला स्वातंत्र्यसैनिक,राजकारणी, क्रिकेटर,अॅक्टरया सगळ्यांचे स्टॅच्यू आपल्याला बघायला मिळतात.
भुशी डॅम,लोणावळ्यात गेल आणि भुशी डॅमला गेल नाही अस कधी होत नाही.खूप सारी तरुणाई पाण्यात मस्ती करताना दिसते. तुम्ही जर ग्रुपने जाणार असाल तर फाशी द्या मला नक्की भेट द्या.
या आणि यासारख्या लोणावळा खंडाळा तील खूप सारे पर्यटन स्थळ बघण्यासारखी आहेत.धन्यवाद!!!
****************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
****************************
******************************************