Lampi virus:लंपी रोग पुन्हा जनावरांमध्ये पसरला येथे बघा कशी घेणार काळजी

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण बघितले असेल मागील काही दिवसापासून Lampi virus लंपी रोग हा जनावरांमध्ये पुन्हा एकदा  आढळत आहे. यामुळे पशुधनाचे बरेच नुकसान देखील झाले आहे. Lampi virus लंपी रोग यामध्ये आपल्या जनावरांची काळजी कशी घ्याल व योग्य तो उपाय कसा करायचा याविषयी आपण बघणार आहोत. Lampi virus लंपी रोग आपल्या जनावरांना होण्यामागे बरेच कारणे आहेत. त्यात विशेष म्हणजे आपण बघितले असेल अलीकडे बाहेर राज्यातील जनावरे विकत आणण्याचे प्रमाण वाढले आहे.अजून म्हणजे गुरांच्या बाजारामध्ये देखील एखादे लंपी ग्रस्त जनावर आल्यास इतर जनावरांना धोका निर्माण होतो.याविषयी आपण खाली सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Lampi virus लंपी रोग
  • लहान वासरांमध्ये या रोगाची जास्त तीव्रता.
  • संकरित गाईंना देखील जास्त धोका.
  • लंपी विषाणूजन्य असल्यामुळे याच्यावर खात्रीशीर उपाय नाही.
  • वेळीच लंपीवर नियंत्रण आणू शकतो.
लंपी म्हणजे काय? लंपी रोगाचा प्रसार कसा होतो?

हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे  याची पसरण्याची शक्यता जास्त असते.लंपी lampi हा संसर्गजन्य असल्यामुळे हा पटकन पसरला जातो.यात लंपी रोगाचा प्रसार रोखण्यासाठी पशुपालकांनी आपला गोठा स्वच्छ व बंदिस्त ठेवावा जेणेकरून बाहेरील वातावरणाशी आपल्या पशुधनाचा संपर्क येणार नाही. लंपी रोग हा संसर्गजन्य असल्यामुळे पशुपालकांनी आपले पशुधन दुसऱ्या पशुधनांच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्यावी.

लंपीग्रस्त जनावराचे दूध माणसाला चालते का?

पशुवैद्यकीय तज्ञ प्राध्यापक नितीन मार्कंडय यांनी याबाबतीत खुलासा केलेला आहे की, जनावरांचे दूध आपण तापल्यावरच पितो त्यामुळे तापून पिलेल्या दुधामुळे माणसाला यापासून धोका निर्माण होणार नाही.

Lampi virus लंपी रोगाची लक्षणे

Lampi virus लंपी रोगा मध्ये जनावरांना पहिले ताप येतो मग जनावरांची खाणी कमी किंवा डायरेक्ट बंद होते.त्याचबरोबर जनावरांच्या अंगावर गाठी येण्यास सुरुवात होते.या गाठी 5 मिलिमीटर ते 50 मिलिमीटर आकारांच्या असू शकतात.या शरीरावर सर्व दूर पसरलेल्या असू शकतात. जेवढी गाठींची संख्या जास्त तेवढी रोगाची तीव्रता जास्त झाल्याचे दिसून येते.

लंपी रोगापासून जनावरांची कशी घ्याल काळजी?

Lampi virus लंपी रोगा पासून आपल्या पशुधनाला कसे वाचवता येईल. यात सर्वात प्रथम आपल्या गोठ्यात स्वच्छता असणे गरजेचे आहे. म्हणजेच डास, माशी, चिलटे, गोचीड यांचा  उपाय आपल्याला करणे गरजेचे आहे. यामध्ये कीटकनाशकांचा फवारा, गोठा कोरडे ठेवणे, आपली जनावरे दुसऱ्या जनावरांच्या संपर्कात न येऊ देणे, याची काळजी पशुपालकांनी घ्यायची आहे.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला