नमस्कार मित्रांनो, आज आपण सोन्या gold rate विषयी जाणून घेणार आहोत.जसे आपण बघतच आहोत सोन्याचे भाव स्वस्त होताने दिसत आहे.सोने दिवसेंदिवस वाढतच होते. गेल्या सहा महिन्यांमध्ये सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. परंतु आता सोने घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. की, सोन्याचे भाव पुन्हा एकदा उतरताना दिसत आहे. त्यामुळे जे लोक Gold सोने घेण्याचा प्लॅन करत आहे. त्यांनी जरूर या दिवसांमध्ये सोने खरेदी करावी. परंतु काही लोकांचे म्हणणे आहे की, सोने भाव खूप कमी होईल का? किंवा खूप वाढेल का? याविषयी बऱ्याच जणांमध्ये संभ्रम आहेत. याविषयी आपण खाली सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत.today gold rate विषय खाली सविस्तर मध्ये बघूया.
gold rate today pune 22 कॅरेट सोने किंमत पर ग्रॅम पुणे
पुण्यामध्ये आज 7 ऑक्टोबर 2023 रोजी 22 कॅरेट सोन्याचे 1 ग्रॅम साठी 5250 रु. इतके आहे.पुण्यामध्ये काल सहा ऑक्टोबर 2023 रोजी 22 कॅरेट सोन्याचे 1 ग्रॅम साठीचे भाव हे 5240 रुपये इतके होते.
जगात सर्वात स्वस्त सोने कुठे
यामध्ये सर्वप्रथम दुबई चे नाव येते.दुबईचे सोने हे शुद्धतेसाठी मानले जाते. या ठिकाणी लोक सोने घेण्यासाठी आवर्जून जातात. त्यानंतर थायलंड मध्ये देखील स्वस्त सोने मिळते.या ठिकाणी चायना टाऊन मधील रोडवर सोने खरेदीसाठी अनेक लोक जमा असतात. यानंतर हॉंगकॉंग मध्ये देखील सोने खरेदीसाठी मोठे शॉपिंग सेंटर आहेत. स्विझर्लंडच्या सोन्याच्या चर्चा तर जगभरात आहे. येथील सोन्याच्या डिझाईन्स साठी लोक मागणी करतात.
why gold rates are falling सोन्याचे दर का पडत आहेत
जेव्हा सोन्याचा पुरवठा जास्त असेल आणि मागणी कमी असेल तेव्हा किंमत घसरते. याव्यतिरिक्त, व्याजदर, चलनवाढ, चलन मूल्य, भू-राजकीय घटना आणि आर्थिक परिस्थिती यासारख्या इतर घटकांचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो.
काही तज्ञांच्या मते सोने दर gold rate हे काही दिवस समाधानकारक नसणार आहे. परंतु हा काळ जास्त नसणार असून थोड्याच दिवसांमध्ये सोने पुन्हा उच्चांकी पातळीवरच राहणार.याकडे ग्राहकांनी संधी म्हणून बघावे. व सोने खरेदी कडे समाधानकारक रित्या बघावे. लोकल मार्केटमध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांचा कल दिसून येत आहे.
Gold Market India सोने भारतीय बाजार
काही दिवसांमध्ये नवरात्रीला सुरुवात होत आहे. त्यामुळे स्त्रियांचा कल हा सोने खरेदी करिता दिसून येत आहे. सध्या पितृपक्ष पंधरवडा चालू असल्याकारणाने हिंदू संस्कृतीमध्ये पितृपक्ष पंधरवड्यात खरेदी तसेच गृहप्रवेश
व इतर काही गोष्टींसाठी अशुभ मानले जाते. पितृपक्ष पंधरवडा संपलेला असून महिला नवरात्रीनिमित्त सोने खरेदी साठी इच्छुक दिसत आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये सोन्याचे महत्त्व खूप आहे. सोने हे ऐश्वर्याचे प्रतीक मानले जाते. तसेच सोने परिधान करण्यासाठी अनेक जण खूप उत्साही असतात. सोने हे परिधान केल्यानंतर महिलांच्या सौंदर्यामध्ये अधिक भर घालतात. हिंदू संस्कृतीमध्ये कुठलेही कार्य म्हणले तर सोन्याविना ते शक्य नाही असेच म्हणावे लागेल. कारण मूल जन्माला आल्यावर व माणूस मेल्यानंतर ही त्याच्यासोबत सोने दिले जाते.
लग्न समारंभामध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वधूवरांस मोठ्या हौशीने वेगवेगळ्या सोन्याच्या डिझाईन असलेल्या भूषण अलंकारांनी नटवले जाते. लग्नसराईच्या तारखांमध्ये भारतीय बाजारपेठे मधील सोने हे अति भाव खातात. त्या काळामध्ये सोन्याची अति प्रमाणात खरेदी होते.
dubai gold rate today दुबई सोने आजचे भाव
दुबईमध्ये 22 कॅरेट गोल्ड चे आजचे भाव हे 10 ग्रॅम साठीचे AED 2045 इतके आहे.
दुबईतील सोने हे भारतीय सोन्या पेक्षा 15% स्वस्त आहे. याचे कारण म्हणजे, भारतामधील सोन्यावर लावला जाणारा टॅक्स हे देखील आहे.
Gold rate change in 20 years सोने भाव वीस वर्षातील बदल
वर्ष 2000-2001 ला सोने हे प्रति 10 ग्रॅम 4300 रु. इतके होते. मागील 23 वर्षांमध्ये सोन्याचे भाव यामध्ये बदल घडवून 2022-2023 ला सोनी हे प्रति 10 ग्रॅम 60,300 रु. इतक्या उच्चांकी पातळीवर आले आहे.

1 thought on “Gold Rate Today : सोने का होत आहे एवढे स्वस्त आजचे भाव बघा येथे”