नमस्कार शेतकरी मित्रांनो,यावर्षी शासनाने सांगितल्याप्रमाणे खरीप हंगामातील पिक विमा हा 1 रुपया मध्ये काढून मिळणार आहे.परंतु हा खरीप हंगामातील पिक विमा मिळवण्यासाठी आपल्याला अजून एक काम करायचे आहे ते म्हणजे ई-पीक पाहणी. ई-पीक पाहणी म्हणजे शेतकऱ्याला त्याच्या सात बारा वरील नोंद ही स्वतः करता येणार आहे. यामुळे शेतकऱ्याला फायदा मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे ई-पीक पाहणी मध्ये सामायिक क्षेत्रातील शेतकऱ्यांना सुद्धा आपली पिक नोंदणी स्वतः करता येणार आहे.शासनाच्या ई-पीक पाहणी धोरणामुळे नक्कीच शेतकऱ्यांचा वेळ देखील वाचणार आहे. आणि विशेष बाब म्हणजे शेतकरी स्वतःच्या पिकाची नोंद स्वतः करणार आहे.ई-पीक पाहणी कशी करायची व त्यासाठी कोणते ॲप वापर करायचे हे आपण आज जाणून घेणार आहोत.
ई-पीक पाहणी माहिती
- 7\12 वर पीक स्वतः नोंदवता येणार.
- सामायिक क्षेत्रात स्वतंत्र नोंद करता येणार.
- 31 जुलै 2023 ई-पीक पाहणी शेवटचा दिवस.
- ई-पीक व्हर्जन 2 ॲप हाताळण्यास सोपे.
शासनाने सर्व शेतकऱ्यांना आव्हान केले आहे की, खरीप हंगामातील ई-पीक पाहणी ही आवश्यक आहे. ती जर नसेल तर आपल्या 7\12 वर पीक लावण्यात येणार नाही. आणि याचा फटका शेतकऱ्यांना पिक विमा मध्ये बसेल. जर आपण ई-पीक पाहणी केली नाही तर पिक विमा ही मिळणार नसल्याच सांगण्यात येत आहे.ई-पीक पाहणी कशी करायची हे आपण बघूया.
ई-पीक पाहणी कशी करायची ?
ई-पीक ॲप मध्ये सर्वात प्रथम आपल्या मोबाईलची लोकेशन ऑन करावे.महसूल विभाग निवडावा.नवीन असाल तर खातेदार नोंदणी करून पुढे जावे.पिक माहिती नोंदवा या ऑप्शन वर क्लिक करून शेताच्या मध्यावर उभा राहून पिकाचा क्लिअर फोटो काढून अपलोड करणे.म्हणजे 7/12 वर आपल्या पिकाची नोंद घेतली जाईल.
ई-पीक पाहणी ॲप e pik pahani app
ई-पीक नोंदणीसाठी, ई-पीक व्हर्जन 2 ॲप याचा वापर करावा हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
epik pahani version 2 app download
ई-पीक व्हर्जन 2 ॲप प्ले स्टोअर वर डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE.
ई-पीक पाहणी शेवटची तारीख ?
शासनाने सांगितल्याप्रमाणे ई-पीक पाहणी शेवटची तारीख ही 31 जुलै 2023 ही सांगण्यात आली होती.तरी सर्व शेतकऱ्यांनी 31 जुलै पर्यंत म्हणजे आज आपल्याला पिकांची नोंदणी करणे आवश्यक आहे अन्यथा आपल्याला पिक विमा व शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळणार नाही.त्यामुळे वरील ई-पीक पाहणी ॲप e pik pahani app डाऊनलोड करून आपली पिके सातबारावर नोंदवून घ्यायचे आहेत.