Crop Insurance : 25% अग्रीम पिक विमा रक्कम मिळणार परंतु ई पीक पाहणी नोंदणी आवश्यक

Agrim Crop Insurance : नमस्कार शेतकरी मित्रांनो, पावसाने मारलेल्या दडीमुळे रब्बी व खरीप दोन्हीही हंगाम धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. यात आता महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी मदत जर वेळेत मिळाली. तर शेतकऱ्यांना यातून मार्ग मिळेल. शासनाकडून विविध अनुदान जाहीर तर होतात पण ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेपर्यंत उशीर झालेला असतो. पिक विमा कंपन्यांकडून crop insurance claim क्रॉप इन्शुरन्स क्लेम करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यायला हवी.यात आता शासनाने 25% अग्रीम पिक विमा रक्कम मिळणार असल्याचे जाहीर केले आहे.परंतु ते लाभ कोणाला मिळणार याविषयी आपण सविस्तर खाली जाणून घेणार आहोत. हे सर्व अनुदान आपल्याला मिळवण्यासाठी एक गोष्ट महत्त्वाची असणार आहे. ती म्हणजे ई पीक पाहणी नोंदणी e pik pahani हे करणे आवश्यक आहे.

सर्व शासकीय अनुदान, पिक विमा लाभ, संततधार आशा व इत्यादी सर्व अनुदानासाठी शासनाने ई पीक पाहणी  e pik pahani आवश्यक केलेली आहे.ई पीक पाहणी नोंदणी शेवटची तारीख e pik pahani last date व ती कशी करायची.25% अग्रीम पिक विमा लाभाचे निकष काय आहेत हे आपण जाणून घेऊयात.

शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा रक्कम मिळणार

पिक विमा कंपनीला आपण पिक विमा भरून आपल्या पिकाला सुरक्षित करत असतो. यात पिक विमा कंपन्यांकडून वेगवेगळे निकषावर पिक विमा लाभ जाहीर केलेले असतात.यात महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती म्हणजे बऱ्याचशा मंडळामध्ये पावसाने दडी मारलेली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झालेले आहे.विमा कंपनीच्या नियमानुसार पीक लागवडीपासून 21 ते 25 दिवस पावसाने दडी मारल्यास.शेतकऱ्यांना 25% आगरी पिक विमा रक्कम देण्यात येते.म्हणजे ज्या मंडळामध्ये 21 ते 25 दिवस पाऊस पडलेला नाही त्यांना याचा लाभ मिळणार आहे.याविषयी सर्वे झालेला असून लवकरात लवकर याची अंमलबजावणी होणार आहे.परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदणी केलेली नाही त्यांना या लाभापासून वंचित राहाव लागणार आहे.त्यामुळे खाली दिलेली माहिती बघून लवकरात लवकर ई पीक पाहणी नोंदणी करून घ्यावी.

e pik pahani mahiti ई पीक पाहणी माहिती
  • सर्व अनुदानांसाठी ई पीक पाहणी नोंदणी आवश्यक.
  • e pik pahani app हाताळण्यास सो सोपे.
  • सामायिक क्षेत्र असल्यास स्वतंत्र नोंद करता येणार.
  • शासनाने ई पीक पाहणी मुदत वाढवली.
  • e pik pahani version 2
ई पीक पाहणी e pik pahani online कशी करायची

ई पीक पाहणी करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्मार्टफोनवर म्हणजेच मोबाईलवर ई पीक पाहणी व्हर्जन-2 e pik pahani version-2 हे ॲप आपल्याला प्ले स्टोअर वर जाऊन प्रथम डाऊनलोड e pik pahani app download करून घ्यायचे आहे. त्यानंतर ॲप आपल्याला इन्स्टॉल करायचे आहे. वेळोवेळी दाखवलेल्या सूचनांचे पालन करून e pik pahani online आपल्याला आपली पूर्ण माहिती नोंदवायची आहे.

e pik pahani last date 2023 ई पीक पाहणी नोंदणी शेवटची तारीख

शासनाने शेतकऱ्यांसाठी ई पीक पाहणी नोंदणी शेवटची तारीख वाढवलेली आहे. बऱ्याच शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नोंदणी अपूर्ण असल्यामुळे शेतकरी लाभा पासून वंचित राहू नाही म्हणून शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2023 केलेली आहे.सर्व शेतकऱ्यांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत आपली ई पीक पाहणी नोंदणी करून घेणे बंधनकारक आहे.

e pik pahani version 2 download ई पीक पाहणी व्हर्जन-2 डाउनलोड click here.

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला