नमस्कार मित्रांनो, आपण बघत असाल महाराष्ट्रात अलीकडे डोळे येण्याच प्रमाण खूप वाढल आहे.मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांसह पूर्ण महाराष्ट्रभर डोळ्यांची साथ पसरली आहे. आणि या डोळे येण्याच्या आजारामध्ये लहान मुलांची संख्या जास्त आहे. आज आपण या डोळ्यांच्या आजाराची कारणे, लक्षणे,, परिणाम, उपाय, घेण्याची काळजी, डॉक्टरांची मते, या सर्व जाणून घेणार आहोत. डोळ्यांच्या आजारांमध्ये बरेच प्रकार येतात.सध्या जो आजार पसरतोय त्याला इंग्रजीमध्ये ‘conjunctivitis’ किंवा ‘Eye Flu’ अस देखील म्हणल जात. Conjunctiva हा डोळ्यांचा एक भाग असतो म्हणजे डोळ्याचा जो पांढरा भाग असतो त्यावर एक ट्रान्सपरंट लेयर असते.या भागाला इन्फेक्शन झाल की डोळे लाल होतात. आपण त्याला डोळे येन म्हणतो.
यामध्ये होणारे इन्फेक्शन हे व्हायरल किंवा बॅक्टेरियल असू शकत. परंतु जास्त करून हे इन्फेक्शन हे व्हायरल असत. पावसाळ्यामध्ये हा व्हायरल पसरण्याच प्रमाण जास्त वाढत.
डोळे येण्याची कारणे
- बदलत हवामान खास करून पावसाळा.
- पावसाळ्यात संसर्गजन्य आजार जास्त पसरतात.
- डोळ्यांसंबंधी स्वच्छता न पाळणे.
डोळे येण्याची लक्षणे
- डोळे आलेल्या व्यक्तीचे डोळे लाल होतात.
- डोळ्यातून सतत पाणी येणे.
- डोळ्यांना सूज येते.
- डोळ्यांनी दिसण्यास त्रास होणे.
- डोळ्यांची आग होणे.
- डोळ्यांमध्ये खाज येणे.
काही व्यक्तींना इतरही त्रास जाणवू शकतो त्यामध्ये सर्दी, ताप येणे, हे देखील होऊ शकत.हे वायरल इन्फेक्शन कोणालाही होऊ शकत. पण त्याच जास्त प्रमाण हे लहान मुलांमध्ये आढळून येत. लहान मुलांचा शारीरिक खेळ खेळताना एकमेकांसोबत जास्त संबंध येतो त्यामुळे हा आजार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात असतो.
डोळे येण्याची साथ पसरू नये यासाठी काळजी कशी घ्यावी

- वेळोवेळी हात स्वच्छ धुणे.
- सतत डोळ्यांना स्पर्श न करणे.
- संक्रमित व्यक्तीपासून लांब राहण.
- डोळ्यात ड्रॉप टाकताना हात स्वच्छ धुन.
डोळे येणे हे आती धोकादायक नसल तरी स्वच्छता पाळणा, डोळे आलेल्या व्यक्तीने इतर लोकांच्या संपर्कात न येणे. व अति त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण हे देखील गरजेचे आहे.