नमस्कार मंडळी, आज आपण डेल्टा कॉर्प शेअर विषयी माहिती बघणार आहोत. ही कंपनी जगभरात पसरलेली आहे. अनेक गुंतवणूकदारांना मार्केटमधून चांगला नफा या कंपनीने मिळवून दिलेला आहे. आता पुन्हा एकदा ही संधी आहे का? अशी चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे. डेल्टा कॉर्प लिमिटेड या कंपनीची स्थापना 1985 ला झालेले आहे. आता ही कंपनी 38 वर्षाची आहे. या कंपनीचे उद्योग हे कॅसिनो, हॉस्पिटलिटी, ऑनलाइन जुगार हे आहेत.यामध्ये आज आपण डेल्टा कॉर्प या शेअर delta corp share price विषयी काय होप्स निघतील हे बघणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया डेल्टा कॉर्प शेअर विषयी सर्व माहिती.
डेल्टा कॉर्प माहिती delta corp information in marathi
डेल्टा कॉर्प ही भारतातील सर्वात मोठी कॅसिनो चेन आहे. गोव्यात तिला तीन कॅसिनो चालवण्याचा परवाना आहे. डेल्टिन रॉयल, डेल्टिन जेएक्यूके आणि डेल्टिन कॅरावेला.डेल्टा कॉर्पने गोव्यात गेमिंग आणि हॉस्पिटॅलिटी व्यवसायात आपले स्थान मजबूत केले आहे.कंपनीने गोव्यातील आपले स्थान मजबूत केले आहे. कंपनीने अनेक वर्षांपासून गोव्यातील पर्यटन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.डेल्टा कॉर्पच्या कॅसिनोमध्ये अत्याधुनिक सुविधा आणि गेमिंग पर्याय उपलब्ध आहेत. कंपनीने आपल्या ग्राहकांना उत्तम गेमिंग अनुभव देण्यावर भर दिला आहे.
डेल्टा कॉर्प शेअर घसरण्याची कारणे why delta corp share price is down
डेल्टा कॉर्प शेअर विसरण्याची पुढील काही प्रमुख कारणे आहेत. जीएसटी विभागाकडून डेल्टा कॉर्पला १६,१९३ कोटी रुपयांची टॅक्स नोटीस मिळाली आहे. या नोटीशीविरुद्ध कंपनीने न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी, यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.डेल्टा कॉर्पच्या आर्थिक निकालांमध्ये गेल्या काही तिमाहीत अपेक्षित तेजी आलेली नाही. यामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास डिगला आहे.जगभरात मंदीची भीती वाढत असून, यामुळे कॅसिनो आणि हॉस्पिटॅलिटीसारख्या क्षेत्रांवरही नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे डेल्टा कॉर्पच्या शेअरच्या किमतीत घसरण झाली आहे.
डेल्टा कॉर्प शेअर घसरण्याची महत्त्वाची कारणे delta corp share price is down
- ऑनलाइन गेमिंग मुळे कॅसिनो व्यवसायावर होणारा परिणाम.
- कंपनीच्या व्यवस्थापनात झालेले काही बदल
- कंपनीच्या वाढीव योजनांच्या अंमलबजावणीमध्ये झालेली उशीर.
डेल्टा कॉर्प शेअर किंमत delta corp share price
डेल्टा कॉर्प शेअर आज मार्केटमध्ये 128.95 रुपयांनी ओपन झाला. या शेअरचा 52 वीक हाय हा 259.95 इतका आहे. तर 52 वीक लो हा 122.60 आहे.