chandra grahan 2023 : 28 ऑक्टोबर 2023 खंडग्रास चंद्रग्रहण,कोजागिरी पोर्णिमा,ग्रहण पर्वकाळ, काय टाळावे

नमस्कार मंडळी, ऑक्टोबर 2023 मध्ये येणारे खंडग्रास चंद्रग्रहण हे भारतामध्ये दिसणारा असून, त्याविषयी सर्व गोष्टी आज आपण बघणार आहोत. यामध्ये कोजागिरी पोर्णिमा,ग्रहण पर्वकाळ, ग्रहण दिसणारे प्रदेश, पुण्यकाल, ग्रहणाचा वेध, ग्रहणातील कृती, ग्रहणाचे राशिफल, अजून महत्त्वाचे म्हणजे कोजागिरी आणि ग्रहण याचा होणारा परिणाम यामध्ये काय करावे व काय करू नये. याविषयी खाली आपण सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत. आम्ही आपल्यासाठी खास काही जेष्ठ मंडळी कडून पूर्णपणे माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया 28 ऑक्टोबर 2023 रोजी होणाऱ्या कोजागिरी पोर्णिमा खंडग्रास चंद्रग्रहणा विषयी सर्व माहिती.

ग्रहण दिसणारे प्रदेश chandra grahan oct 2023

भारतासह संपूर्ण आशिया,ऑस्ट्रेलिया, रशिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण आफ्रिका खंड या प्रदेशात ग्रहण दिसेल. असे सांगण्यात आलेले आहे. हे ग्रहण भारतासह सर्वत्र खंडग्रास दिसणार आहे.

खंडग्रास चंद्रग्रहण मराठी माहिती khandgras chandragrahan marathi mahiti

पृथ्वीवरून पाहिले असता जेव्हा चंद्राचा काही भाग पृथ्वीच्या सावलीत येतो. त्या प्रक्रियेला खंडग्रास चंद्रग्रहण असे म्हणतात.

चंद्रग्रहण पुण्यकाल मराठी chandragrahan punyakal marathi

यावेळी येणाऱ्या चंद्रग्रहणामध्ये पुण्यकाळ हा ग्रहण स्पर्शापासून ते ग्रहण मोक्षा पर्यंत आहे.

ग्रहणाचा वेध मराठी grahancha vedh mahiti

28 ऑक्टोबर शनिवार रोजी दुपारी 3:14 पासून ग्रहणाचे वेध पाळावेत.यामध्ये बालवृद्ध,अशक्त,आजारी व्यक्ती आणि विशेष करून गर्भवतींनी शनिवारी सायंकाळी 7:41 मिनिटांपासून वेध पाळावेत.वेधामध्ये भोजन सोडून स्नान,जप,देवपूजा करता येईल तसेच पाणी पिणे,झोपणे,मलमूत्र करता येईल.

grahan timing grahan time ग्रहण पर्वकाळ

ग्रहण पर्व काळामध्ये म्हणजे रात्री 1:05 मिनिटांनी ते 2:23 मिनिटांनी या काळामध्ये पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र स्तर्ग, ही कामे टाळावीत.

chandra grahan 2023 maharashtra चंद्रग्रहण 2023 महाराष्ट्र

चंद्रग्रहण स्पर्श होताच स्नान करावे. पर्व काळामध्ये देवपूजा, जप, होम हवन, दान धर्म, करावेत.ग्रहणामध्ये कुठल्या राशीला कुठले लाभ आहेत हे आपण जाणून घेऊयात. कुठल्या राशीला अनिष्ट फळ व कुठल्या राशीला मिश्र फळ तर कुठल्या राशींना शुभ फळ आहेत हे आपण खाली जाणून घेऊयात.

ग्रहणाचे राशीफळ grahan rashifal marathi

मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभफळ आहेत.सिंह, तुला, धनु, मीन या राशींना मिश्र फळ आहेत. तर मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना अनिष्ट फल आहेत. ज्या राशींना अनिष्ट फळ आहेत. त्या राशींच्या व्यक्तींनी आणि गर्भवतींनी हे ग्रहण पाहण्याचे टाळावे.

Kojagiri purnima grahan time

यावर्षी म्हणजेच  28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण येत आहे. हे चंद्रग्रहण रात्री 1:05 मिनिटांनी ते 2:23 मिनिटांनी असा ग्रहणाचा पर्वकाळ आहे.कोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करावी याविषयी खाली आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊयात.

कोजागिरी पोर्णिमा ग्रहण मराठी माहिती Kojagiri purnima in marathi

28 ऑक्टोबर 2023 रोजी येणाऱ्या  चंद्रग्रहणाचा कालावधी हा आपण बघितला. पर्वकालाच्या अगोदर  वेधकाळात  प्रतिवर्षीप्रमाणे रात्रीचे वेळी लक्ष्मी व इंद्राची पूजन करायला हरकत नाही. दूध साखरेचा नैवेद्य दाखवता येईल. जो प्रसाद आपण घेणार आहोत तो केवळ एक परीवर किंवा थोडासा चमचाभर घ्यावा. बाकीचा प्रसाद दुसऱ्या दिवशी प्राशन करण्यात यावा.

कोजागिरी पौर्णिमा चंद्रग्रहण 2023 मराठी माहिती Kojagiri purnima chandragrahan marathi

कोजागिरी पौर्णिमे विषयी आपण वर संपूर्ण माहिती बघितलेली आहेत. यावर्षी कोजागिरी पौर्णिमेला खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी, ज्येष्ठ आपत्यास म्हणजेच मोठ्या मुला मुलीस  ओवाळणे चालते.   आकाशदीप दान चालते. कुलधर्म कुलाचार चालतो. रात्री लक्ष्मीपूजन व इंद्रपूजन चालते. दूध आटवलेला नैवेद्य चंद्राला व इंद्राला दाखवलेला चालतो. आपण प्रसाद म्हणून तो नैवेद्य दुसऱ्या दिवशी प्राशन करू शकता.

1 thought on “chandra grahan 2023 : 28 ऑक्टोबर 2023 खंडग्रास चंद्रग्रहण,कोजागिरी पोर्णिमा,ग्रहण पर्वकाळ, काय टाळावे”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला