bail pola 2023: बैल पोळा मुहूर्त,तारीख,बैल पोळा विषयी संपूर्ण माहिती बघा येथे

नमस्कार मित्रांनो, आज आपण बैल पोळा विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत.वर्षभर शेतीमध्ये शेतकऱ्यांसोबत राबत आपल्या मालकाला शेती करण्यासाठी साथ देणाऱ्या बैलांविषयी एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बैलपोळा. या दिवशी मोठ्या उत्साहाने शेतकरी राजा आपल्या बैलांची पूजा करून त्याला पुरणपोळी भरवतात. या दिवशी कोणताच शेतकरी बैलाला खांद्यावर ओझे देत नाही.कर्नाटकात याला बेंदूर म्हणून ओळखले जाते. पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात हा बेंदूर म्हणून साजरा केला जातो. मराठवाडा व विदर्भात पोळा म्हणून साजरा केला जातो.bail pola  बैलपोळ्या विषयी खाली आपण सविस्तर मध्ये जाणून घेऊया.

bail pola 2023 date बैलपोळा 2023 तारीख

यावर्षीचा  बैलपोळा हा सण  दि.14/09/2023 वार गुरुवार रोजी साजरा करण्यात येणार आहे.

bail pola festival bail pola information in marathi बैलपोळा माहिती

बैलपोळा हा सण मोठ्या उत्साहात महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो. यावेळी हा सण 14 सप्टेंबर 2023 रोजी पिठोरी अमावस्येला साजरा करण्यात येणार आहे.या दिवशी शेतकरी बांधव आपली बैल जोडी सजवून गावातील मारुती मंदिराजवळ घेऊन जातात.त्या ठिकाणी सर्व गावातील बैल जोडी जमा होतात. सर्व शेतकरी बांधव तिथे काठी खेळ, ढोल वाजवतात, मंदिराभोवती बैल जोडीला प्रदक्षिणा मारतात. मोठ्या उत्साहात शेतकरी बांधव तेथे उपस्थित असतात. वेशीला तोरण बांधलेले असते. ते तोरण जोपर्यंत खाली सोडले जात नाही तोपर्यंत सर्व बैल जोडी तिथे उभे असतात. तोरण खाली सोडले की, सर्व शेतकरी धावत आपल्या बैल जोडीना वेशीच्या आत घेऊन येतात व गाव प्रदक्षिणा मारून आपल्या घरी घेऊन जातात.घरी आणल्यानंतर  महिला त्यांची पूजा करतात त्यांना पुरणपोळी खाऊ घालतात.

bail pola in marathi बैलपोळा मराठी माहिती

बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी शेतकरी बांधव आपल्या  बैलांच्या खांद्यावर दही,तूप,भात,हळद व मोळ चोळतात.यालाच खांदा मळणी असे म्हणतात. बैलांची खांदा मळणी केली जाते. शेतकरी बांधव  बैलांनी आपल्या प्रति खांद्यावर जु घेऊन जी मेहनत केलेली असते. त्याविषयी खांदा मळणी करून कृतज्ञता व्यक्त करत असतात. यात शेतकरी पूजेचे ताट घेऊन आपल्या गोठ्यात संध्याकाळीच जातात. तिथे गेल्यावर बैलांची खांदा मळणी करून, त्यांचे औक्षण करतात. व त्यांचे नामकरण देखील करतात.आजवर जशी साथ दिलीस तशी साथ पुढे देखील दे असे आपल्या बैलांना म्हणतात.

bail pola sajawat बैलपोळा सजावट
bail pola sajawat
bail pola sajawat

बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी सकाळीच  आपल्या बैलांना स्वच्छ धुऊन घेतात. त्यांना पोटभर चारा टाकला जातो. त्यानंतर दुपारी त्यांना सजवले जाते. यामध्ये खूप सारे शेतकरी आपल्या बैलांवर संदेश लिहीत असतात. व लोकांचे लक्ष वेधून घेतात. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा,happy bail pola.इत्यादी  बैलांच्या पाठीवर लिहून शुभेच्छा देतात. काही शेतकरी  वेगवेगळ्या कलरच्या फुग्यांनी बैलांना सजवतात. बैलांच्या शिंगांना कलर म्हणजेच हिंगुळ लावून आपल्या बैलांना सजवतात.बाजारामध्ये आता विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य आलेले आहेत. त्याचा वापर करून शेतकरी आपल्या बैलांना सजवतात.

bail pola images
bail pola quotes in marathi bail pola wishes in marathi

शेतामध्ये वर्षभर राबवून जो करतो धरणे मातीची सेवा असे अपार कष्ट करतो आपला सर्जा राजा शेतकऱ्याच्या सच्चा मित्राला बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

जसे दिव्या विना वातीला आणि कष्टाविना मातीला तसेच बैला विना नाही शेतीला पर्याय पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

happy pola

प्रत्येक पावलावर देतो बळीराजाला साथ, बनवून त्या बळीराजाचा उजवा हात. म्हणूनच आपली जोडी आहे खास  बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा

happy bail pola

शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे. तुझ्या घामान फुलणाऱ्या पिकाला,तुझ्या डोळ्यात सजू दे. हॅपी बैलपोळा

हॅपी बैलपोळा 2023

bail pola information bail pola in english CLICK HERE

बैल पोळा माहिती हिंदी मध्ये बघण्यासाठी येथे क्लिक करा

4 thoughts on “bail pola 2023: बैल पोळा मुहूर्त,तारीख,बैल पोळा विषयी संपूर्ण माहिती बघा येथे”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला