नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुधारित हवामान अंदाज hawaman andaz 31ऑगस्ट 2023 आपण बघणार आहोत.यावेळी पावसाने बऱ्याच ठिकाणी अजूनही हुलकावणी दिलेली आहे.आपण 31 ऑगस्ट पासून पुढील आठवड्याचा अंदाज new hawaman andaz आज बघणार आहोत.राज्यातील तुरळ भाग सोडला तर अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यात बरेच तर्कवितर्क हवामान अभ्यासाकांनी सांगितलेत.यात आता पुढील पावसाळा कसा?हाच एक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.त्यासाठीच आपण आठवडाभराचा हवामान अंदाज आज आपण बघणार आहोत.चला तर मग आपण बघूया सुधारित हवामान अंदाज 31 ऑगस्ट 2023 नंतरचा पूर्ण आठवडा.
hawaman andaz maharashtra
पुढील दोन दिवसात महाराष्ट्र राज्यामध्ये जोरदार पाऊस बरसणार असल्याच हवामान अभ्यासक सांगत आहेत.2 सप्टेंबर व 3 सप्टेंबर 2023 राज्यात मुसळधार होणार आहे,नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी मध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस होणार असल्याचा अंदाज IMD ALERT दर्शवण्यात आलेला आहे.सप्टेंबर 2023 मध्ये राज्यात 91 मिलिमीटर ते 109 मिलिमीटर पावसाचा hawaman andaz अंदाज दर्शवण्यात आलेला आहे.19 सप्टेंबर पर्यंत हा पाऊस पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत सर्वात कमी पाऊस झालेले जिल्हे
धुळे, नंदुरबार, अमरावती, अकोला, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, हिंगोली,परभणी, बीड, नगर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली.या सर्व जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत पाऊस खूप कमी पडलेला आहे.या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा 20% ते 60% इतका सरासरी पेक्षा पाऊस कमी झालेला आहे.
आतापर्यंत सर्वात जास्त पाऊस पडलेले जिल्हे
पालघर, ठाणे, नांदेड या तीनच जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.बाकी संपूर्ण महाराष्ट्रभर पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे.
Drought in india दुष्काळाचं संकट?
यावर्षी अजून देखील भारतात सक्रिय पाऊस झालेला नाही. त्यामुळे, संपूर्ण भारतावरच अन्नटंचाई, पाणीटंचाई यासारख्या गोष्टींच सावट आहे. दुष्काळामुळे खरीप व रब्बी असे दोन्हीही हंगाम धोक्यात आहेत. यात काही तज्ञांचे तर म्हणणे आहे की शतकातला सर्वात मोठ्या दुष्काळाचे सावट यावर्षी असू शकेल.