शेतकरी मित्रांनो नमस्कार, यावर्षी मान्सून सक्रिय व्हायला तर उशीर झालाच परंतु पुढेही त्याची वाटचाल काही समाधानकारक झाली नाही. सगळीकडे आता शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे. पाऊस हा येणार का? यावर वेगवेगळे हवामान तज्ञ आपले मत मांडत आहेत. यात आता सरकारकडून कृत्रिम पाऊस Artificial Rain पाडणार असल्याचे सांगण्यात येत आहे.याविषयी शासनाद्वारे काही गोष्टींचा अभ्यास करणे चालू असल्याचे समजते.यंदा महाराष्ट्रावर दुष्काळी संकट हे खूप दाट असल्यामुळे राज्यात कृत्रिम पाऊस पाडावा असे बरेच जणांचे म्हणणे आहे.याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया.
काय असतो कृत्रिम पाऊस? Artificial Rain
कृत्रिम पावसामध्ये ढगांमध्ये मोठ्या प्रमाणात बीज रोपण करून नैसर्गिकरीत्या पडणाऱ्या पावसासारखी प्रक्रिया उत्तेजित करणे याला कृत्रिम पाऊस Artificial Rain म्हणतात.
महाराष्ट्रात कधी पाडणार कृत्रिम पाऊस Artificial Rain?
याविषयी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी कृत्रिम पाऊस हा पाडणे विषयी बऱ्याच मागणी येत असल्याचे म्हणले आहे. त्याविषयी शास्त्रज्ञांची चर्चा करून मार्ग काढण्यात येणार आहे. जर खरच कृत्रिम पाऊस हा यशस्वीरित्या पार पाडता आला. तर दुष्काळावर आपल्याला नक्कीच मात करता येणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर कृत्रिम पावसाला Artificial Rain पोषक वातावरण असेल. तर शासन दरबारी लगेच याविषयी निर्णय घेण्यात येईल असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
कृत्रिम पाऊस Artificial Rain कसा पाडतात?
आपल्या महाराष्ट्रात कृत्रिम पाऊस हा विमानाने फवारणी करून पाडला जातो.सर्वप्रथम रडारच्या मदतीने बाष्पयुक्त ढगांची माहिती आपल्याला मिळते. त्यानंतर विमान रसायनासह त्या ढगात शिरत व बाष्प युक्त ढगात विमान रसायन सोडते. आणि नंतर अर्धा ते पाऊण तासात पावसाला सुरुवात होते.
राज्यातील विभागात झालेला आतापर्यंतचा पाऊस
विभाग | पाऊस किती पडतो | आतापर्यंत पडलेला पाऊस |
कोकण | 766 mm | 217 mm |
नाशिक | 197 mm | 40 mm |
पुणे | 247 mm | 54 mm |
मराठवाडा | 193 mm | 44 mm |
अमरावती | 231 mm | 68 mm |
नागपूर | 347 mm | 193 mm |
raksha bandhan 2023:रक्षाबंधन मुहूर्त ,भद्रा काळ,शुभ मुहूर्त येथे बघा सर्व माहिती