नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात यावर्षी मान्सून काही समाधानकारक झालेला नव्हता. परंतु, पावसाने पुन्हा एकदा जोरदार सुरुवात केलेली आहे. यामुळे खरिपातील 50% नुकसानापासून शेतकऱ्याचा बचाव नक्की होईल. व रब्बी देखील सुरक्षित होईल. मागील तीन-चार दिवसांमध्ये राज्यातील भाग बदलत मुसळधार ते अति मुसळधार पावसाने संपूर्ण राज्यभर आपले हजेरी लावलेली आहे. प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 26 सप्टेंबर 2023 रोजी पुन्हा एकदा राज्यातील पावसाविषयी हवामान अंदाज व्यक्त केलेला आहे. तो आपण सविस्तर मध्ये खाली जाणून घेणारच आहोत. यामध्ये पुढील वातावरणाविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे.
panjabrao dakh andaz पंजाब डख हवामान अंदाज
- 4 ऑक्टोबर 2023 मान्सून राज्यातून परतीच्या मार्गावर
- hawaman andaz हवामान अंदाज
- rain update रेन अपडेट
panjabrao dakh hawaman andaz पंजाबराव डख हवामान अंदाज
प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी सांगितले की, राज्यामध्ये 26 सप्टेंबर 2023 ते 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत भाग बदलत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे.या पावसामध्ये ओढे, नदी, नाले, सर्व दूर भरून वाहतील. असे त्यांनी यावेळी सांगितले.
rain update जास्त पाऊस पडणारे जिल्हे
मुंबई,नागपूर, नाशिक, संपूर्ण कोकणपट्टी, पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, लातूर, नगर, संभाजीनगर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये एकदम चांगला पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव डख punjab dakh यांनी सांगितले.
पंजाबराव डख यांनी कोल्हापूर जिल्ह्यासाठी विशेष संदेश दिलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता 1 ऑक्टोबर पर्यंत आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर येण्याची दाट शक्यता आहे.
राज्यामध्ये 5 ऑक्टोबर 2023 नंतर हवामान हे कोरडे राहणार असल्याचे पंजाबराव डख यांनी सांगितले. यामुळे द्राक्ष बागायतदारांना छाटणीसाठी वेळ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी ज्यांची सोयाबीन काढण्यासाठी आली असेल. त्यांनी 5 ऑक्टोबर नंतर राज्यामध्ये कडक ऊन पडणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सोयाबीन काढून एक दिवस ऊन देऊन ते झाकून ठेवावे. असे पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले.