महिलांच्या अनेक व्रतामध्ये हरतालिका हे व्रत सर्वश्रेष्ठ आहे. आपल्याला मनासारखा पती मिळावा व असलेल्या पतीला उदंड आयुष्य लाभो व निरोगी आयुष्य लाभो याकरिता हे वृत्त करतात.सात जन्माचे पाप नाहीसे होते. स्त्रियांचे सौभाग्य वाढते.hartalika puja कशी करायची? हरतालिका साठी लागणारी सामग्री हरतालिका पूजा विधि, कथा याविषयी आपण सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत. हरतालिका हे व्रत कोणतीही स्त्री करू शकते लग्न झालेली किंवा न लग्न झालेली सुद्धा करू शकते.लग्न झालेली स्त्रि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी तर तरुणी चांगला पती मिळवण्यासाठी हे व्रत करतात चला तर खाली सविस्तर मध्ये जाणून घेऊयात हरतालिका पूजा 2023 विषयी.
hartalika puja 2023 हरतालिका पूजा 2023
- hartalika puja in marathi
- hartalika puja images in marathi
- hartalika puja samagri
- hartalika puja vidhi marathi
- hartalika puja vidhi
- hartalika puja katha in marathi
hartalika puja हरतालिका पूजा
पार्वती मातेने हे व्रत केल होत महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी.गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका असे म्हणतात.या दिवशी हरतालिका पूजा केली जाते.
hartalika puja in marathi हरतालिका पूजा मराठी माहिती
सर्वप्रथम आपल्याला वाळूचा उपयोग करून महादेव पिंड बनवून घ्यायची आहे.चौरंगावरती अक्षदा ठेवून दिवा स्थापन करून घ्यायचा आहे.दिव्याला हळद कुंकू वाहून दिव्याची पूजा करून घ्यायची आहे.hartalika puja vidhi marathi पूजा सुरू करायच्या आधी गणपती बाप्पांची पूजा करून घ्यावयाची आहे.चौरंगा वरती अक्षदा ठेवून गणपती बाप्पांना विराजमान करायच आहे.गणपती बाप्पांना हळद कुंकू ,अक्षदा, वस्त्रमाळ,दूर्वा,आघाडा वाहून हात जोडून नमस्कार करायचा आहे.चौरंगावरती दोन विडे मांडावे. एक गणपती बाप्पांचा तर एक महादेव पार्वती चा वीडा ठेवायचा आहे.विड्यावरती खारीक,खोबर, बदाम, हळकुंड ठेवून घ्यायच आहे.त्यानंतर आपण चौरंगावरती अक्षदा ठेवून सखी व पार्वतीची मूर्ती स्थापन करणार आहोत.हळदी कुंकू वाहून वस्त्रमाळ, फुल, वाहायची आहेत.त्यानंतर आपण महादेवाच्या पिंडीची पूजा करणार आहोत. महादेवाच्या पिंडीला पंचामृत वाहून पाणी वाहून घ्यायचे आहे. त्यानंतर महादेवाला भस्म लावायचा आहे व अक्षदा वाहून घ्यायचे आहेत.महादेवाला वस्त्रमाळ, धोत्र्याचे फुल, बेलपत्र, वाहून घ्यायचे आहे. घेतलेल्या पत्री अर्पण करायचे आहेत. आणि मनोभावे नमस्कार करून महादेवाला आपल्या सुख,समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे.hartalika puja vidhi
hartalika puja samagri हरतालिका पूजा सामग्री
हरतालिका ही पूजा करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे वाळू असावी. वाळू स्वच्छ धुऊन घ्यायचे आहे. वाळू आपल्याला महादेव बनवण्यासाठी हवी आहे. त्यानंतर हरतालिकेची मूर्ती, पंचामृत, स्वच्छ पाणी, अष्टगंध, चंदन, कापूर, भस्म, अक्षदा, हळदीकुंकू, विड्याची पाने, सौभाग्य अलंकार, धूप, निरंजन, वस्त्र माळ, पांढरे वस्त्र माळ महादेवासाठी तर रंगीत्व्रमा हरतालिकेसाठी. गुळखोबरा नैवेद्य, गणेशाची मूर्ती, जानव, पत्री,पांढरी फुले, दूर्वा, धोतरा फुल फळ, नैवेद्यासाठी आपल्या आवडीनुसार फळ किंवा दही साखर दूध साखर घ्यावे.
hartalika puja katha in marathi हरतालिका पूजा वृत्त कथा मराठी
एके दिवशी शंकर-पार्वती कैलास पर्वतावर बसले होते. पार्वतीने शंकरांना विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते?? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादं व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्राहक सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस.हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो.
तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठे. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पान खाऊन होतीस.तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी?अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली. आणि येण्याचे कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे. ती विष्णूला द्यावीस तेच तिचे योग्य पती आहे.त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठविले आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानेही गोष्ट कबूल केली नंतर नाराज तेथून विष्णू कडे आले. नारद तिथून आल्यावर तुझ्या पित्याने ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीला रागावण्याचं कारण विचारलं.तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही, असा माझा निश्चय आहे, असं म्हणून माझ्या पित्याने मला विष्णूला देण्याचे कबूल केला आहे. याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीने एका घोर आरण्यात नेल.तिथे तू एका गुहेमध्ये माझं लिंग पार्वती सह स्थापितलस. त्याची पूजा केलीस.
तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यान मी तुला दर्शन दिल. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याच पारन केलस. इतक्यात तुझा बाप तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले. मग तू हकीकत सांगितलीस. पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिल. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या वृत्ता न तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात.याचा विधी असा आहे.
ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचा असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावी, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वती सह महादेवाचे लिंग स्थापन करावं, सोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, नंतर ही कहाणी करावी. रात्री जागरण करावं.याने प्राणी पापा पासून मुक्त होतो.साता जन्माचे पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वान द्यावं दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे.ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गाईची गोठी, पिंपळाची पारी सुफळ संपूर्ण.