शेतकरी मित्रांनो नमस्कार, यावर्षी मान्सून सक्रिय व्हायला तर उशीर झालाच परंतु पुढेही त्याची वाटचाल काही समाधानकारक झाली नाही. सगळीकडे आता शेतकऱ्यांना चिंता लागलेली आहे. पाऊस हा येणार का? यावर वेगवेगळे हवामान तज्ञ आपले मत मांडत आहेत. कोणी म्हणत येणार तर कोणी म्हणत नाही येणार यात भरडला मात्र शेतकरी जातो. यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर्षी मानसून वर एल नीनो चे सावट असणार का?काय आहे हे एल नीनो EL Nino आणि ला नीना La Nina.याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.चला तर मग शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात.एल नीनो EL Nino आणि ला नीना La Nina.
एल नीनो EL Nino आणि ला नीना La Nina विषयी
- एल नीनो EL Nino म्हणजे कमी पाऊस.
- ला नीना La Nina म्हणजे जास्त पाऊस.
- बाष्प ढग एल नीनो EL Nino मध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जातात.
- EL Nino मध्ये पूर्वेकडे पाऊस तर पश्चिमेकडे दुष्काळ असतो.
भारतात पाऊस कधी पडतो ?
जेव्हा मान्सूनचे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात म्हणजेच भारतात समुद्रापासून जमिनीकडे वाहतात. आणि ते बाष्प घेऊन येतात तेव्हा पाऊस पडत असतो.
एल नीनो EL Nino आणि ला नीना La Nina भारतावरील प्रभाव
ला नीना La Nina वेळी मुख्य वारे जे असते ते अति प्रभावितपणे दूरवर वाहते. त्यामुळे पाऊस खूप बरसतो.याउलट एल नीनो EL Nino मध्ये मान्सूनला रोखण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे तो पुढे जात नाही आणि परिणामी पाऊस कमी पडतो.
अमेरिकेच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा जून ते ऑगस्ट दरम्यान एल नीनो EL Nino हा भारतात सक्रिय असू शकतो.याच काळात भारतात पाऊसकाळ असल्यामुळे याचा भारताच्या हवामानावर परिणाम होईल असे अमेरिकेच्या हवामान विभागाच्या अंदाजात म्हटले आहे.
एका अहवालानुसार 2002, 2004, 2009, आणि 2012,2018 मधील दुष्काळ हा एल नीनो EL Nino मुळेच पसरला होता.यावर्षी जर एल नीनो EL Nino चे सावट आले. EL Nino चे सावट हे नऊ महिन्यांसाठी असते.त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्ववत होते. तर खरीप व रब्बी मध्ये पिकांसाठी अडचण होऊ शकते. तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील जाणवू शकते.