महाराष्ट्र सरकार सगळ्या नागरिकांचा समान विचारत करते. त्यामुळे सतत नवनवीन योजना आणि उपक्रम महाराष्ट्र सरकार राबवत असते. तर आता सरकारने वारकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आहे.आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी वारकऱ्यांसाठी एक नवीन घोषणा केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वारकयांसाठी नुकतीच विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना 2023 सुरु केली आहे. ही योजना दैवत विठ्ठल रुक्मिणी पंढरपूर वारीसाठी येणाऱ्या वारकरी संप्रदायासाठी सुरू केलेली आहे.
विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना 2023 बद्दल संपूर्ण माहिती आपण येथे सविस्तर बघणार आहोत.
शासनाच्या आदेशानुसार विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजने च्या अंमलबजावणीची/प्रक्रियेची सर्व जबाबदारी सरकारच्या मदत आणि पुनर्वसन विभागाची असणार आहे. याबाबतचा शासन निर्णय वित्त विभागाने यापूर्वीच घेतला आहे.
विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना २०२३ चे वैशिष्ट्ये खालील प्रमाणे;
दिंडी दरम्यान अपघात किंवा अपघातात वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना 2023 अंतर्गत वारसदाराला 5 लाख रुपये दिले जाणार आहेत.
दिंडीदरम्यान कायमस्वरूपी अपंगत्व विमा कंपनी त्या व्यक्तीला एक लाख रुपये देईल.
दिंडीदरम्यान अंशत: अपंगत्व आल्यास ५० हजार रुपये दिले जातील.
या कालावधीत जर वारकरी आजारी पडला तर आजारी वारकऱ्याला 35,000 रुपयांपर्यंत वैद्यकीय उपचार दिले जातील.
विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना 2023 या योजनेच्या अटी व शर्ती शासन निर्णयात नमूद करण्यात आल्या आहेत.
वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
दरवर्षी वारकरी दिंडी मार्गाने आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाला जात असतात. वाढत्या वाहनाच्या संख्येमुळे वारकऱ्यांचा जीव धोक्यात जात होता. ही बाब लक्षात घेऊन कित्येक वारकरी संघटना शासनाकडे वारकऱ्यांसाठी विमा छत्र योजनेची मागणी करत होते.
राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी ही बाब लक्षात घेऊन वारकऱ्यांसाठी विठ्ठल रुक्मिणी वारकरी विमा छत्र योजना चालू केली आहे.अधिक माहिती साठी आपल्या whatsapp ग्रुप ला जॉईन व्हा.
*******************************
आपल्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा CLICK HERE
*******************************
*******************************