New Talathi Bharti Update:तलाठी भरती अचानक झालेला बदल बघा येथे.

नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती विषयी आम्ही महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहोत, आत्ताच प्राप्त झालेल्या माहिती नुसार राज्यातील नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोकण, पुणे तसेच अमरावती विभागातील या तलाठ्यांच्या ४ हजार ६४४ पदभरतीसाठी राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे.

यात १५ जून २०२३ पासून प्रक्रिया सुरू होणार असतानाच शासनाने अनुकंपाधारकांची २० टक्के पदे भरण्याचे आदेश दिल्याने आता ही प्रक्रिया थोडी लांबणार असल्याची माहिती मिळत आहे. 

या नवीन शासन निर्णयामुळे जागांमध्ये महत्वाचा फरक पडणार आहे. आता नवीन पदांचा तपशील आणि अनुकंपा भरतीसाठी आवश्यक असलेल्या निर्णयाची पुनरर्चना झाल्यावर, तलाठी भरतीचा नवीन मुहूर्त निघणार आहे.

या नवीन बदलामुळे उमेदवार थोडे नाराज झाले आहे, कारण आता पर्यंत विविध कारणामुळे तलाठी भरती पुढे ढकलणे सुरूच आहे, त्यात या वेळेस भरतीचे अपेक्षित तारीख आल्यावर सुद्धा हि भरती अचानक पुढे ढकलण्यात आली आहे.

तलाठी भरती प्रक्रियेत उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार असल्याचे समजते. साधारण गटासाठी १ हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार होते.

त्यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना भरती प्रक्रियेसाठी लिंक खुली होण्याची प्रतीक्षा लागली होती. तशातच राज्य शासनाचे अनुकंपाधारकांच्या २० टक्के जागा भरण्याचे आदेश दिल्याने आकडेवारी आता आरक्षणनिहाय बदलणार आहे. तलाठी भरतीची पुढील नवीन तारीख आणि सर्व अपडेट्स आम्ही लवकरच प्रकाशित करू.

************************************

Railway Bharti 2023

********************************

New Bharti June 2023:वनरक्षक भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरू……….

*******************************

New MPSC Bharti: जिल्हा परिषद मेगा भरती अर्ज सुरु……..

******************************

2 thoughts on “New Talathi Bharti Update:तलाठी भरती अचानक झालेला बदल बघा येथे.”

Leave a comment

एक ग्लास मोसंबी ज्युस एवढे पैसे वाचवू शकतो तुमचे बघा येथे adani green share price या शेअर च्या ९ गोष्टी आहेत का तुम्हाला माहिती या ९ सवयी तुम्हाला कायम ठेवतील जगाच्या एक पाऊल पुढे या ८ स्टेप मध्ये करा आपल्या पिकाचे नुकसान भरपाई क्लेम crop insurance ‘हिटमॅन’ रोहित शर्मा च्या या गोष्टी माहित आहे का तुम्हाला