नमस्कार मित्रांनो, नवरात्री 2024 ला सुरुवात होत आहे. सगळीकडे आनंदमय वातावरणामध्ये देवीचे आगमन करण्यासाठी सर्वजण उत्साही आहे. नवरात्रीचे नऊ दिवस महाराष्ट्रामध्ये देवीची आराधना पारंपारिक पद्धतीने केली जाते. यावर्षी नवरात्रीचा पहिला दिवस हा 3 ऑक्टोबर 2024 रोजी येत आहे. याविषयी मुहूर्त व सर्व काही आपण खाली सविस्तर मध्ये जाणून घेणार आहोत.नवरात्रि 2024 कलश स्थापना कधी करायची ते आपण बघणार आहोत. नवरात्री विषयी उपवास करतांनी अनेक संभ्रम निर्माण होत असतात. जसा भाग बदलतो तशा प्रत्येकाच्या प्रथा बदलत असतात.
नवरात्रि 2024 कलश स्थापना मुहूर्त kalash sthapana time navratri 2024 october
घटस्थापना मुहूर्त यावर्षी 2024 मध्ये नवरात्री ही 3 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. शारदीय नवरत्न रात्रीला घटस्थापना तर महत्त्वाची तिथे आहेच. त्यासोबतच अष्टमी आणि नवमी या दोन तिथी देखील महत्त्वाच्या आहेत. पहिल्या दिवशी घटस्थापना मुहूर्त हा 3 ऑक्टोबर 2024 रोजी दिवसभर आहे.नवरात्री 2024 कलश स्थापना मुहूर्त साध्य झाला पाहिजे. या दिवशी देवी दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येत असते. पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केली जाते.
नवरात्री 2024 उपवास navratri 2024 upvas
महिलांमध्ये शारदीय नवरात्री मधील नऊ दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात. विविध उपवास करून देवीचे आराधना केली जाते. प्रत्येक भागात पूर्वीपासून एक प्रथा चालत आलेली असते त्यानुसार पुढे महिला त्याप्रमाणे उपवास करतात. काही जुन्या मंडळी सोबत चर्चा केल्यावर त्यांनी असे सांगितले की, नवरात्रीमध्ये फळे खाऊन केलेला उपवास अत्यंत चांगला व लाभदायी असतो.त्यांच्या म्हणण्यानुसार देवीची आराधना महत्त्वाची आहे. अष्टमी व नवमी यामध्ये नऊ माळीचे पुण्य प्राप्त असते.
नवरात्री बालिका पूजन navratri balika pujan
शारदीय नवरात्री मध्ये बालिका पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. व त्याचे पुण्यही अनन्यसाधारण मिळते. तसे तर नवरात्रीमध्ये कुठल्याही दिवशी आपल्या घरी बालिका बोलून त्यांना पोटभर फराळ किंवा फलो आहार द्यावा. यासाठी वय वर्ष 2 ते वय वर्ष 10 अशा बालिका बोलवाव्या. बालिका पूजन अष्टमी किंवा नवमीला झाले तर अधिकच चांगले. महिला ह्या प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत नवरात्रीचे व्रत पाळतात. त्यामुळे दशमीला सुद्धा उपवास सोडताना काही महिला बालिकांसोबत उपवास सोडतात.
tanishq navratri gift is real or fake तनिष्क नवरात्री गिफ्ट बातमी
आठ दिवसापासून आपल्या व्हाट्सअप वर एक मेसेज येत आहे.तनिष्क तर्फे आपल्याला नवरात्री गिफ्ट tanishq navratri gift scam पाठवले आहे. त्याच्यात मग कुठे i phone ची चर्चा तर कुठे अजून काही. यामध्ये आम्ही पडताळणी केली असता. असा कुठलाच मेसेज तनिष्क तर्फे पाठवण्यात आले नसल्याचे सांगण्यात येत आहे. जर तुम्हालाही असा मेसेज आला तर त्या व्हायरल मेसेज वर क्लिक करू नका. याविषयी पोलीस यंत्रणाकडूनही सांगण्यात आलेले आहे की, कुठल्याही लिंक वर व्हेरिफाय केल्याशिवाय क्लिक करू नका. व जे लोक हे मेसेज फॉरवर्ड करतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे.